IPL 2025 GT vs RR 23rd Match : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या घरच्या मैदानात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघानं राजस्थानला रोखत यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या संघानं साई सुदर्शनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात ६ बाद २१७ धावा करत राजस्थानसमोर २१८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १५९ धावांत आटोपला. गुजरात टायटन्सच्या संघानं ५८ धावांनी हा सामना जिंकला आहे. ५ पैकी ४ सामन्यातील विजयासह त्यांच्या खात्यात आता ८ गुण जमा झाले असून गुणतालिकेत ते अव्वलस्थानावर पोहचले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साईच्या दमदार खेळीशिवाय चार चौघांनी उपयुक्त खेळीसह धावफलकावर लावल्या २१७ धावा
पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. संघाचा कर्णधार शुबमन गिल स्वस्तात माघारी फिरला. मग सामन्याची सर्व सूत्रे साई सुदर्शन याने आपल्या हाती घेतली. त्याने ८२ धावांची दमदार खेळी केल्यामुळे गुजरातच्या संघाने घरच्या मैदानातील लढाई दोनशे पारची केली. साईशिवाय गुजरातच्या संघाकडून जोस बटलर ३६ (२५), शाहरुख खान ३६(२०), राशीद खान १२ (४) आणि राहुल तेवतियानं १२ चेंडूत २४ धावा केल्या. राजस्थानकडून तुषार देशपांडे आणि तीक्षणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आणि संदीप शर्माला एक विकेट मिळाली.
IPL Record: साईच्या भात्यातून 'फिफ्टी'चा विक्रमी 'पंच'; पठ्ठ्या थेट एबीच्या पंक्तीत जाऊन बसला
राजस्थानकडून फक्त तिघांनीच गाठला दुहेरी आकडा
धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन या जोडीनं राजस्थानच्या डावाला सुरुवात केली. पण यशस्वी जैस्वाल एक चौकार मारून ६ धावांवर तंबूत फिरला. संजू सॅमसन याने २८ चेंडूत केलेल्या ४१ धावा, रियान परागची १४ चेंडूतील २६ धावांची खेळी आणि हेटमायरनं केलेल्या ३२ चेंडूतील ५२ धावा वगळता राजस्थानच्या ताफ्यातून कुणालाच दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी संघाचा डाव १५९ धावांवर आटोपला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. राशीद खान आणि साई किशोरयांनी प्रत्येकी २-२ विकेट आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय मोहम्मद सिराज, अर्शद खान आणि कुलवंत खेजरोलिया याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.