IPL 2025 GT vs RR Jofra Archer bowled Shubman Gill : राजस्थान रॉयल्स (RR) संघातील स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने खराब कामगिरीनंतर दमदार कमबॅक केले आहे. गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या २३ व्या सामन्यातही त्याने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात त्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिलला स्वस्तात माघारी धाडले. ज्या मैदानावर शुबमन गिलचा रेकॉर्ड भारी आहे तिथं जोफ्रानं मैदान मारलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोफ्रानं कमालीचा वेग अन् अप्रतिम स्विंगसह शुबमन गिलला दिला चकवा
शुबमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जोफ्रानं त्याला गती अन् अप्रतिम स्विंगसह चकवा दिला. आर्चरने ऑफ-स्टंपवर जवळपास १४७.७ kph वेगाने टाकलेला चेंडू टप्पा पडून आत आला अन् शुबमन गिल बोल्ड झाला. आयपीएलमध्ये १५ चेंडूचा सामना करताना तिसऱ्यांदा शुबमन गिल जोफ्राच्या गोलंदाजीवर आउट झाला.
IPL 2025 : टी-२० तील किंग! 'करामती' खान ४ वेळा 'पिक्चर'मध्ये आला; पण 'ब्लॉकबस्टर' शो नाही दिसला
जोफ्रानं आधीच केली होती भविष्यवाणी? सोशल मीडियावर जुनं ट्विट व्हायरल
जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर आपल्या भेदक माऱ्याशिवाय रंजक ट्विटमुळेही चर्चेत असतो. शुबमन गिलला अप्रतिम चेंडूवर बोल्ड केल्यावर जोफ्राचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोफ्रानं २८ जुलै २०२३ रोजी आपल्या अधिकृत अकाउंटवरून एक ट्विट केले होते. तो कधीच स्टंप मिस करत नाही, अशा आशयाचे ये ट्विट आहे. जोफ्रा आर्चरनं या ट्विटच्या माध्यमातून आधीच गिलच्या विकेटची भविष्यवाणी केली होती, असा अर्थ काढून त्याचे जुने ट्विट चर्चेत आला आहे. याआधीही जोफ्रा आधीच काही घटनांचा अंदाज लावतो, या आशयाच्या त्याच्या ट्विटर पोस्टची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.
Web Title: IPL 2025 GT vs RR Jofra Archer bowled Shubman Gill With 147.7 kmph English pacer Predicted The Stunner Wicket 9 Months Ago Tweet Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.