Sai Sudharsan Equalled AB de Villiers IPL Record :गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलं नाही ते साई सुदर्शन याने करून दाखवलं आहे. एकाच मैदानात सलग पाच अर्धशतकासह साई सुदर्शन याने खास विक्रम प्रस्थापित केलाय. याआधी आयपीएलमध्ये फक्त एबी डिव्हिलयर्सनं अशी कामगिरी केली होती. साईन त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुजरातच्या संघासह साईनंही गाठला २०० धावसंख्येचा आकडा
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. गुजरातच्या अहमदाबादच्या मैदानात दमदार कामगिरीचा विक्रम असलेला शुबमन गिल स्वस्तात तंबूत परतला. १४ धावांवर GT नं आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर साई सुदर्शन याने संघाचा डाव सावरला. त्याने ५३ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८२ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघानं निर्धारित २० षटकात ६ बाद २१७ धावांपर्यंत मजल मारली. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात २०० धावा करणारा साई सुदर्शन हा पहिला भारतीय फलंदाजही ठरला.
Jofra Archer Bowled Shubman Gill : गिलच्या विकेटची जोफ्रानं आधीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल
अहमदाबादच्या मैदानात सलग पाचव्या अर्धशतकासह सेट केला खास विक्रम
राजस्थान विरुद्धच्या लढतीसह साई सुदर्शन याने अहमदाबादच्या मैदानात सलग पाचवे अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही भारतीय बॅटरनं एका मैदानात सलग पाच अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केलेली नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर साई सुदर्शन याने गत हंगामात सलग दोन अर्धशतके झळकावली होती. यंदाच्या हंगामात सलग ३ अर्धशतकासह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. याआधी २०१८-१९ च्या हंगामात आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सन अशी कामगिरी केली होती.