भारतीय युवा विकेट किपर बॅटर इशान किशन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून हवा करताना दिसतोय. पहिल्याच सामन्यात त्याने शतकी धमाका करत सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. आता सोशल मीडियाव त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानची मैदानातील वाईट सवय सांगत त्याची फिरकी घेताना दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् इशान किशन पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवानला केलं ट्रोल
माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळणाऱ्या इशान किशनसोबतच्या गप्पा गोष्टीचा एक खास व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इशान किशन एका प्रश्नाच उत्तर देताना मोहम्मद रिझवानचा दाखला देत त्याची मैदानातील वाईट खोड सांगताना दिसते.
SRH Star Abhishek Sharma: आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात दोन शतकं; IPL मध्ये अजून एकही नाही आलं
माजी आंतरारष्ट्रीय पंचांनी कौतुक करताना विचारला होता खास प्रश्न
या व्हिडिओत माजी पंच आणि सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेले अनिल चौधरी इशान किशनच्या परिपक्वतेचे कौतुक करताना पाहायला मिळते. माझ्या अंपायरिंग कारकिर्दीत तू बऱ्याच मॅचेस खेळला आहेस. आधी तू खूप अपील करायचास. पण आता तुझ्यात खूप बदल झालाय. आता तू आवश्यकतेनुसार अपील करतोस. हा बदल कसा झाला? असा प्रश्न ते इशान किशनला विचारतात. या प्रश्नाच उत्तर देताना इशान किशन याने मोहम्मद रिझवानचा दाखला दिला.
इशान किशननं पाक क्रिकेटरचा दाखला देत असं दिलं उत्तर
मैदानात विकेटमागे उभे असताना अपील करण्यासंदर्भातील प्रश्नावर इशान किशन म्हणाला की, मला वाटतं की, सध्याच्या घडीला अंपायर अधिक स्मार्ट झाले आहेत. उगाच सारखी अपील केली तर ते आउट असतानाही नॉट आउट देतील. त्यामुळेच पूर्ण खात्री असेल तरच अपील करातो. यामुळे पंचाच्या मनातही आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही. मोहम्मद रिझवानसारखे काही तर करायला गेले तर पंच विकेटच देणार नाही, अशी गमंतीशीर कमेंट त्याने केली. पाकिस्तानी कॅप्टन मैदानात विना कारण अपील करत असतो, असे म्हणत एका अर्थाने त्याला ट्रोलच केले आहे.
Web Title: IPL 2025 Ishan Kishan Trolls Pakistan Wicketkeeper Mohammad Rizwan Conversation With Umpire Anil Chaudhary Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.