Join us

IPL 2025 : सरकारी नोकरी मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता दृष्टिकोन बदलला!

जाणून घेऊयात KKR च्या ताफ्यातील स्टार क्रिकेटर्ससंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:32 IST

Open in App

IPL 2025 KKR vs GT 39th Match Player to Watch Harshit Rana Kolkata Knight Riders :  भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. या खेळाची दिवसांगणिक वाढत असलेली क्रेझ अन् आयपीएलसह टीम इंडियाकडून प्रतिनिधीत्व करताना मिळणारा मोठा पैसा अन् प्रसिद्धी या गोष्टींमुळे एक उत्तम करिअर म्हणूनही क्रिकेटकडे पाहिले जात आहे. लोकप्रिय खेळात छंद जोपासून मोठी स्वप्न बघणाऱ्या गर्दीत छाप सोडणं हे आणखी एक वेगळं चॅलेंज. वर्षांनुवर्षे मेहनत घेतल्यावरही फार कमी खेळाडूंना अल्पावधित मोठे यश मिळते. त्यातीलच एक चेहरा म्हणजे हर्षित राणा. फारच कमी काळात त्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडत मोठे यश मिळवल्याचे पाहायला मिळते. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून आयपीएलच्या मैदानात धमक दाखवून त्याने टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये धमाक्यात पदार्पण करून दाखवले आहे. जाणून घेऊयात KKR च्या ताफ्यातील स्टार क्रिकेटर्ससंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सरकारी नोकरीची क्रेझ असलेल्या भागात जन्मला, पण क्रिकेटमध्ये रमला

हर्षित राणा हा एक जलदगती गोलंदाज आहे. फलंदाजीमध्येही तो मोठे फटकेबाजी करू शकतो. या क्रिकेटरचा जन्म दिल्लीतील घेवरा या छोट्याशा गावात झाला. इथंच तो लहानाचा मोठा झाला. त्याचे वडीलही खेळाडू होते. ते वेटलिफ्टिंग आणि साखळी गोळाफेक (Hammer Throw) प्रकारात CRPF चे प्रतिनिधीत्व करायचे. उत्तर भारतातील ज्या गावात हर्षित जन्मला तिथं सरकारी नोकरीला पहिली पसंती दिली जाते. पण हर्षित राणा हा क्रिकेटमध्ये रमला. त्याला कुटुंबियांनीही पाठिंबा दिला अन् आज तो स्टार क्रिकेटर्सपैकी एक झालाय. 

IPL 2025 : नेहरानं IPL मधून गायब झालेल्या चेहऱ्यावर 'भरवसा' दाखवला, अन्...

 गावातल्या पोरांमध्येही रुजला क्रिकेटचा छंद, हर्षिता राणा होण्याचं लागलंय याडं

हर्षित राणानं सरकारी नोकरीच्या मागे न धावता क्रिकेट निवडलं अन् त्यात त्याने यशही मिळवून दाखवलं. त्याच्या यशामुळे त्याच्या भागातील पोरांचाही दृष्टिकोन बदलला आहे. जिथं फक्त सरकारी नोकरी हे ध्येय बाळगले जायचा तिथल्या पोरांमध्ये आता क्रिकेटचा छंद रुजलाय. पालकही आपल्या मुलांना अकादमीत घालण्याला पंसती देतात. हर्षित राणाच्या यशानंतर त्याचा चुलत भाऊ निशांत याने एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता की, आता इथं हर्षित राणासारखं क्रिकेटर होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत आहेत. 

हर्षित राणाच्या गोलंदाजीतील खासियत

हर्षित राणा हा सातत्याने १४० kph वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज आहे. आपल्या उंचीचा पूरेपूर वापर करत कमालीच्या बाउन्सरसह तो फलंदाजांना अडचणीत आणतानाही पाहायला मिळाले आहे. यॉर्करसह आखूड टप्प्यावर गोलंदाजी करत कमालीच्या विविधतेमुळे त्याची गोलंदाजी आणखी धारदार होते.

IPL मधील कामगिरी

हर्षित राणानं आतापर्यंत २८ आयपीएल सामने खेळले असून त्याच्या खात्ात ३५ विकेट्सची नोंद आहे. गत हंगामात १३ सामन्यात त्याने १९ विकेट्स घेतल्या होत्या. याच कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. गत हंगामात ७ सामन्यात त्याने १० विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सगुजरात टायटन्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट