GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!

KKR कडून कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाशिवाय अन्य कुणालाही आपल्या भात्यातील धमक दाखवता आली नाही.     

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 23:36 IST2025-04-21T23:34:03+5:302025-04-21T23:36:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs GT Gujarat Titans beats Kolkata Knight Riders Prasidh Krishna Rashid Khan Take Two Wickets | GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!

GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans, 39th Match  : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला रोखून दाखवले. यंदाच्या हंगामातील आणखी एका विजयासह प्लेऑफ्सची आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे. दुसरीकडे ८ सामन्यातील पाचव्या पराभवामुळे कोलकाता संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या आघाडीच्या फलंदाजांनी हिट शो दिला. दुसऱ्या बाजूला धावांचा पाठलाग करताना KKR कडून कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाशिवाय अन्य कुणालाही आपल्या भात्यातील धमक दाखवता आली नाही.     

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

GT च्या ताफ्यातील आघाडीच्या तिघांनी केली दमदार बॅटिंग

घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सच्या संघाकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिल या जोडीनं दमदार सुरुवात करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. साई सुदर्शन याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. शुबमन गिल  ५५ चेंडूत ९० धावांची खेळी करून तंबूत फिरल्यावर जोस बटलरनं २३ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी करत गुजरातच्या धावफलकावर ३ बाद १९८ धावा लावल्या होत्या. कोलकाताच्या संघाकडून वैभव अरोरा, हर्षित राणा आणि रसेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाशिवाय कुणाचाच लागला नाही निभाव

गुजरातच्या संघाने सेट केलेल्या १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाने सलामीला केलेला नवा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. क्विंटन डिकॉकच्या जागी संधी मिळालेल्या गुरबाझला सिराजने पहिल्याच षटकात तंबूत धाडले. सुनील नरेनही १३ चेंडूत १७ झाला करून तंबूत परतला.  एका बाजूनं विकेट पडत असताना अजिंक्य रहाणेनं ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. पण त्याची विकेट पडल्यावर कोलकाताच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्यात अखेरच्या षटकात कोलकाताने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात रघुवंशीवर डाव खेळला. त्याने १३ चेंडूत २७ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे कोलकाताच्या संघाने  निर्धारित २० षटकात ८ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली. 

IPL 2025 : साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज; निकोलस पूरनलाही टाकले मागे

बॅटिंगनंतर बॉलिंगमध्ये कमाल, राशिदही फॉर्ममध्ये परतला

फलंदाजीमध्ये धमक दाखवलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने  गोलंदाजीतही धमक दाखली. शुबमन गिलने ज्याच्या हाती चेंडू दिला त्याने विकेट पटकावली. प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेटसह पर्पल कॅपच्या शर्यतीतील आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले. त्याच्याशिवाय राशिद खान याने दोन विकेट्स घेतल्या. तो फॉर्ममध्ये परतल्यामुळे गुजरातची ताकद आणखी वाढली आहे. याशिवाय इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि साई किशोर यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

 

Web Title: IPL 2025 KKR vs GT Gujarat Titans beats Kolkata Knight Riders Prasidh Krishna Rashid Khan Take Two Wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.