असं कसं? स्टंपला बॅट लागली तरी सुनील नरेनला आउट नाही दिलं! काय सांगतो हिट विकेटचा नियम?

जाणून घेऊयात नेमकं काय घडंल? पंचांनी त्याला नाबाद ठरवण्यामागचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 22:23 IST2025-03-22T22:19:46+5:302025-03-22T22:23:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs RCB Why was Sunil Narine not given out 'hit wicket Rule Explained | असं कसं? स्टंपला बॅट लागली तरी सुनील नरेनला आउट नाही दिलं! काय सांगतो हिट विकेटचा नियम?

असं कसं? स्टंपला बॅट लागली तरी सुनील नरेनला आउट नाही दिलं! काय सांगतो हिट विकेटचा नियम?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं  आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात झालीये. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात एक वादग्रस्त सीन पाहायला मिळाला. ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाचा सलामीवीर सुनील नरेन याची बॅट स्टंपला लागली. पण तहीही तो नाबाद राहिला. हिट विकेटच्या रुपात त्याला पंचांनी बाद का दिले नाही? हा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. जाणून घेऊयात नेमकं काय घडंल? पंचांनी त्याला नाबाद ठरवण्यामागचं कारण काय? यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असं कसं? त्याला पंचांनी बाद का नाही ठरवलं? 

क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करत असताना शरीराचा भाग किंवा बॅट स्टंपला लागली तर फलंदाजाला हिट विकेटच्या रुपात बाद ठरवण्यात येते. सुनील नरेन मात्र त्याला अपवाद ठरला. अनेक क्रिकेट चाहत्यांना असं कसं? त्याला पंचांनी बाद का ठरवलं नाही? असा प्रश्न  पडला आहे. मैदानातील ही घटना नवा वाद निर्माण करणारी आहे, असेही बोलले जात आहे. पण नियमामुळेच तो नाबाद राहिलाय. 

मॅच वेळी नेमक कधी अन् काय घडलं?

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील आठव्या षटकात नरेनचा बॅट स्टंपला लागली. पण तरीही तो नाबाद राहिला. ही घटना घडली त्यावेळी आरसीबीच्या ताफ्यातील राशिक सलाम डर गोलंदाजी करत होता. त्याने ऑफ स्टंप बाहेर टाकलेला चेंडू मारण्याच्या सुनील नरेनचा प्रयत्न फसला. चौथ्या चेंडू पंचांनी वाइड दिला अन् त्यानंतर सुनील नरेन हिट विकेटच्या रुपात स्पॉट झाला.

हिट विकेटचा नियम काय?

मैदानातील पंचांनी नियमानुसारच त्याला नाबाद ठरवले. यामागचं कारण सुनील नरेन हिट विकेट होण्याआधीच पंचांनी हा चेंडू वाइड घोषित केला होता. त्यामुळे चेंडू डेड झाला होता. एमसीसीच्या  ३५.१.१ या नियमानुसार,  बॉल डेड होण्याच्या  आधीच फलंदाजाला हिट विकेटच्या रुपात आउट देता येते. त्यामुळे सुनील नरेन हिट विकेट होऊनही वाचला.

Web Title: IPL 2025 KKR vs RCB Why was Sunil Narine not given out 'hit wicket Rule Explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.