Join us

IPL 2025 : 'हर पल...' पर्पल कॅप'च्या शर्यतीत दिसलाय; ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून तो टॉप गियर कधी टाकणार?

तो टॉप गियर टाकायला किती वेळ घेणार अन् त्याने पकडलेली गती सनरायझर्स हैदराबादसाठी किती फायद्याची ठरणार ते पाहण्याजोगे असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:43 IST

Open in App

IPL 2025 KKR vs SRH 15th Match Player to Watch Mohammed Shami Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या १८ व्या हंगामात अनेक खेळाडूंनी नव्या फ्रँचायझीसह आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केलीये. मागील तीन हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळणारा आणि या संघाकडून २०२३ मध्ये पर्पल कॅप पटकवणारा मोहम्मद शमी यंदाच्या हंगामात ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून मैदानात उतरलाय. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे तो वर्षभर क्रिकेटच्या मैदानातून बाहेर राहिला. त्याच्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना काव्या मारनच्यासनरायझर्स हैदराबादच्या संघानं त्याच्यावर १० कोटींची बोली लावली. आतापर्यंत त्याच्यावर लागलेली आयपीएलमधील ही सर्वाधिक बोलीही ठरली. पण प्रश्न हा की, यंदाच्या हंगामात त्याचा बोलबाला दिसणार का?  जाणून घेऊयात शमी संदर्भात असा प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण अन्  आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी...

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑरेंज आर्मीच्या गोलंदाजी युनिटमधील तो प्रमुख गोलंदाज, पण...  

मोहम्मद शमीसह  पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल ही त्रिकूट तगडी बॅटिंग ऑर्डर असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या गोलंदाजीची मोठी ताकद आहे. यात शमीवर सर्वांच्या नजरा असतील. आयपीएलमधील  मागील पाच हंगामात शमीची कामगिरीही जबरदस्त राहिलीये. तो सातत्याने सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दिसला आहे. पण यावेळी त्याची सुरुवातही तेवढी प्रभावी झालेली दिसत नाही. पहिल्या ३ सामन्यात त्याच्या खात्यात फक्त २ विकेट्स जमा आहेत. ही आकडेवारी ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून खेळताना त्याच्यासमोर असणारे आव्हान अधोरिखित करणारी आहे.

RCB ला हरवल्यावर शुबमन गिलने विराट कोहलीला मारला टोमणा? ७ शब्दांची पोस्ट व्हायरल

तो टॉप गियर टाकायला किती वेळ घेणार?

मोहम्मद शमीनं देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरुन फिटनेस सिद्ध करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियात एन्ट्री मारली. इथं तो हिटही ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ५ सामन्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या. ज्यात एका मॅचमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने करून दाखवला. ही आकडेवारी शमी फिट अँण्ड हिट असल्याचे सिद्ध करणारी असली तरी आयपीएलमध्ये त्याच्यासमोर एक नवे चॅलेंज असेल. कारण या स्पर्धेत चार-पाच सामने खेळायचे नाहीत. तर इथं १० पेक्षा अधिक सामने खेळताना फिटनेस कायम ठेवून गोलंदाजीतील धार त्याला दाखवून द्यावी लागले. शमीची गाडी आता फर्स्ट गियरमध्येच आहे. तो टॉप गियर टाकायला किती वेळ घेणार अन् त्याने पकडलेली गती सनरायझर्स हैदराबादसाठी किती फायद्याची ठरणार ते पाहण्याजोगे असेल.

शमीची आयपीएलमधील कामगिरी 

आयीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत शमीनं ११३ सामन्यात १२९ विकेट्स घेतल्या आहेत. २०१९ च्या हंगामापासून त्याची कामगिरी एकदम दमदार राहिली आहे. या हंगामात १९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्यावर २०२० च्या हंगामात २० विकेट्स पुन्हा २०२१ च्या हंगामात १९ विकेट्स आणि २०२२ च्या हंगामात पुन्हा २० विकेट्सचा डाव साधल्यावर २०२३ च्या हंगामात त्याने २८ विकेट्स घेत पर्पल कॅपवर पटकावली होती. दुखापतीमुळे २०२४ च्या हंगामाला मुकल्यावर पुन्हा यंदाच्या हंगामात दबदबा दाखवून देण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादमोहम्मद शामीकाव्या मारनकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट