Join us

LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं

रिषभ पंतच्या भात्यातून आले आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 22:07 IST

Open in App

IPL 2025 LSG vs CSK 30th Match Rishabh Pant Fifty : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौच्या ताफ्यातील आघाडीच्या फलंदाजांनी आपल्या स्फोटक फलंदाजीसह प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. पण यंदाच्या हंगामात संघर्ष करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांसमोर त्यांचा तोरा दिसला नाही. तगडी सुरुवात करुन देणारा एडन मार्करम ६ (६) आणि स्फोटक फलंदाजीनं हंगाम गाजवणारा निकोलस पूरन ८ (९) स्वस्तात माघारी फिरले. मिचेल मार्शनं २५ चेंडूत ३० धावा केल्या. पण त्याची विकेट पडल्यावर तखनौचा संघ संकटात सापडला. या परिस्थितीत २७ कोटीचा प्राइज टॅगवाला रिषभ पंतनं आश्वासक खेळी करत संघाचा डाव सावरला.

पंतनं अर्धशतक झळकावत सावरला संघाचा डाव

आघाडीच्या फळीतील भरवशाच्या गड्यांनी लवकर तंबूचा रस्ता धरल्यावर रिषभपंत याने ४९ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ४ चौकारासह ४ षटकार पाहायला मिळाले. धोनीसमोर त्याने हेलिकॉप्ट शॉटही मारला. या सामन्यात सुरुवातीला पंतनं जवळपास १७० च्या स्ट्राइक रेटसह धावा काढल्या. पण दुसऱ्या बाजूनं विकेट पडत असल्यामुळे त्याची गती कमी झाली. अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पथिराना याने त्याची विकेट घेतली. पंतनं या सामन्यात १२८.५७ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्याचे पाहायला मिळाले. 

 IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास

चेन्नईच्या ताफ्यातून जड्डूसह पथिरानानं घेतल्या २ विकेट्स

पंतशिवाय आयुष बडोनीनं १७ चेंडूत २२ धावा केल्या.  अब्दुल समदनं २ षटकाराच्या मदतीने ११ चेंडूत २० धावा केल्या.  लखनौच्या संघाने निर्धारित षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६६ धावा करत चेन्नईसमोर १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजासह पथिराना याने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. खलील अहमदनं मार्करमच्या रुपात एक तर अंशुल कंबोज याने पूरनच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्समहेंद्रसिंग धोनीरिषभ पंत