Join us

IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर युवा खेळाडूला मिळाली IPL पदार्पणाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 20:49 IST

Open in App

Who is Shaik Rasheed IPL Debut For Chennai Super Kings : चेन्न्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये आणखी एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने डेवॉन कॉन्वेच्या जागी भारतीय अनकॅप्ड खेळाडू शेख राशिद याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. या २० वर्षीय खेळाडूसाठी हा खास क्षण आहे. कारण लखनौच्या मैदानातून तो आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. जाणून घेऊयात कोण आहे शेख राशिद अन् त्याचा इथपर्यंतच्या संघर्षमयी प्रवासाची खास स्टोरी  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वडिलांनी दोन वेळा गमावली नोकरी; लेकासोबत बापही करायचा रोज ४० कि.मी.चा प्रवास 

शेख रशिदचा जन्म २४ सप्टेंबर २००४ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर या शहरात झाला. घरची हालाकीची परिस्थिती असताना त्याने क्रिकेटचा प्रवास सुरु केला. पोराला क्रिकेटर करण्यासाठी बापही रोज ४० कि.मी. प्रवास करायचा. शेख राशीद याचे वडील शेख बलिशावली यांनी लेकाला क्रिकेटरच्या रुपात घडवत असताना दोन वेळा नोकरीही गमावली. सर्वोत्तम ट्रेनिंग घेण्यासाठी सुरुवातीच्या काळात बाप-लेक घरापासून मंगलागिरीपर्यंत रोज प्रवास ४० कि.मी. प्रवास करायचे.

IPL 2025 : डियर क्रिकेट...! बायकोनं शेअर केली करुण नायरच्या 'कमबॅक'मागची खास स्टोरी

अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू

२०२२ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील तो प्रमुख खेळाडू होता. या स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे उप कर्णधारपद भूषवले होते. स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करून दाखवली अन् आयपीएलमधील चेन्नई किंग्जच्या संघाने त्याच्यावर डाव खेळला.

२०२३ पासून तो CSK संघात; आता मिळाली पदार्पणाची संधी 

२०२३ च्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने या खेळाडूला २० लाख रूपयात आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. २०२४ च्या हंगामातही शेख राशिद चेन्नईचा भाग होता. पण त्याला दोन्ही हंगामात पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. २०२५ च्या मेगा लिलावात चेन्नईने पुन्हा ३० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. अखेर लखनौविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्समहेंद्रसिंग धोनीरिषभ पंत