Join us

ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च

आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे २०० बळी टिपणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला. या कामगिरीशिवाय या सामन्यात त्याने अब्दुल समदची घेतलेली विकेटही खास होती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:04 IST

Open in App

MS Dhoni's Brilliant Run-Out Of Abdul Samad : लखनौच्या मैदानात रंगलेल्या लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने यष्टीमागे 'द्विशतकी' कामगिरी नोंदवली. लखनौच्या डावातील १४ व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्याने आयुष बडोनी याला यष्टीचित करत २०० वी शिकार केली. आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे २०० बळी टिपणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला. या कामगिरीशिवाय या सामन्यात त्याने अब्दुल समदची घेतलेली विकेटही खास होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

धोनीची हुशारी; ग्लोव्ह्ज न काढता टिपल्या नॉन स्ट्राइक एन्डच्या स्टंप्स

लखनौच्या डावातील १९ व्या षटकात महेंद्रसिंह धोनीने ग्लोव्ह्ज न काढता नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो मारत अब्दुल समदला रन आउट केले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अब्दुल समद स्ट्राइकवर होता. मथीशा पथिरना याने त्याला लेग स्टंपच्या बाहेर वाइड चेंडू टाकला. धोनीने लेग स्टंपच्या खूप बाहेर जात हा चेडू पकडला. यावेळी पंतनं एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धोनीनं नॉन स्ट्राइकवरून आधीच धाव घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पंतला टार्गेट न करता झाल घेतानाच गडबडलेल्या अब्दुल समदला टार्गेट केले. धोनीनं ग्लोव्ह्ज न काढता अचूक स्टंपचा वेध घेत त्याचा खेळ खल्लास केला.

LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं

सोशल मीडियावर धोनीचा व्हिडिओ व्हायरल, माजी क्रिकेटर्स म्हणाला हा तर 'तुक्का'

सोशल मीडियावर धोनीनं डारेक्ट थ्रोसह रन आउटच्या रुपात लखनौला दिलेल्या धक्क्याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. यष्टीमागे धोनी भारी आहेच. पण ग्लोव्ह्ज न काढता स्टंप टिपणं हे अशक्यच आहे. ते शक्य करून दाखवल्यावर धोनी काहीही करू शकतो, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. दरम्यान समालोचन करणाऱ्या मंडळींमध्ये मात्र धोनीनं मारलेल्या थ्रो हा तुक्का असल्याचा शिक्कामोर्तब करण्यात आला.  

समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटर्समध्ये अशी रंगली या थ्रोची चर्चा

एमएस धोनीनं केलेला थ्रो हा तुक्काच आहे, असे मत समालोचन करणाऱ्या रॉबिन उथप्पाने व्यक्त केले. सबा करीमही या चर्चेत सहभागी होता. यष्टीमागच्या अनुभवाचा दाखला देत तोही हो असा थ्रो ठरवून किंवा प्रॅक्टिस करून मारता येत नाही, असे म्हणाला. त्यात भज्जीनेही सामील झाला. धोनी जे काही करतो ते त्याच्या बाजूने होते, असे म्हणत त्याने धोनीचा थ्रो तुक्का असल्याचे म्हटले. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्समहेंद्रसिंग धोनी