Rahul Tripathi Brilliant Catch : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ३० व्या सामना लखनौच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. महेंद्रसिंह धोनीनं नाणेफेक जिंकून घरच्या मैदानात खेळणाऱ्या लखनौच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावले. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने या सामन्यात डेवॉन कॉन्वे आणि आर. अश्विनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे या हंगामात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या राहुल त्रिपाठीला आणखी एक संधी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मैदानात उतरताच राहुल त्रिपाठीनं साजरे केलं 'शतक'
पुणेकर राहुल त्रिपाठीसाठी हा सामना खास ठरला. कारण १०० वा आयपीएल सामना खेळण्यासाठी तो लखनौच्या मैदानात उतरला. या खास सामन्यात बॅटिंगला येण्याआधी फिल्डिंग वेळी त्याने जबरदस्त कॅच घेत मैफिल लुटली. LSG च्या डावातील पहिल्याच षटकात खलील अहमदने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या मार्करमला त्याने स्वस्तात माघारी धाडले. ही विकेट खलील अहमदच्या खात्यात जमा झाली असली तरी त्याचे श्रेय हे राहुल त्रिपाठीलाच द्यावे लागेल. कारण त्याने क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून देत एक अप्रतिम झेल टिपला.
IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास
अप्रतिम कॅचसह लुटली मैफिल
लखनौचा सलामीवीर एडन मार्करम याने खलील अहमदचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागल्यावर तो कव्हरच्या दिशेने गेला. राहुल त्रिपाठीनं मागच्या दिशेला पळत जात एक अप्रतिम झेल घेत मार्करमचा खेळ खल्लास केला. राहुल त्रिपाठीचा जन्म हा रांचीचा. तो तसा धोनीचा गाववला. पण आता तो पुण्यात स्थायिक होऊन पुणेकर झालाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो महाराष्ट्र संघाकडून खेळतो. त्याला त्याचे मित्रमंडळी भैय्या नावाने हाक मारतात. या पुणेरी भैय्यानं लखनौच्या मैदानात सुपर कॅचसह मैफिल लुटल्यावर तो बॅटिंगमध्ये धमक दाखवणार का? तेही पाहण्याजोगे असेल.