LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

 KL राहुलची क्लास खेळी; संजीव गोएंकांची रिअ‍ॅक्शन अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:38 IST2025-04-22T23:35:11+5:302025-04-22T23:38:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs DC Sanjiv Goenka's Face After KL Rahul's Down The Ground Six Pics Goes Viral | LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs DC  : लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील यंदाच्या हंगामातील दुसरा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेती इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात केएल राहुल कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. कारण लखनौ संघाची साथ सोडल्यावर तो पहिल्यांदाच या संघाविरुद्ध मैदानात उतरला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 KL राहुलची क्लास खेळी; संजीव गोयंकांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

 KL Rahul Against LSG
KL Rahul Against LSG

गत हंगामात LSG संघ मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात भर मैदानात पाहायला मिळालेला ड्रामा, त्यानंतर त्याने संघाची सोडलेली साथ यामुळे या लढतीला लखनौ विरुद्ध KL राहुल असे स्वरुप आले होते. चाहत्यांमध्येही त्यामुळे या सामन्याची एक  वेगळी उत्सुकता होती. दिल्लीच्या ताफ्यातून लखनौ विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलनं कडक बॅटिंग केल्यावर सोशल मीडियावर त्याची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळते. केएल राहुलची बॅटिंग बघताना स्टँडमध्ये उभे असलेल्या संजीव गोयंका यांची रिअ‍ॅक्शन पाहून अनेक भन्नाट प्रतिक्रियाही उमटताना दिसते. 

LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

 

केएल राहुल हा पंतपेक्षा शंभर पट्टीने भारी

KL Rahul Against LSG
KL Rahul Against LSG

केएल राहुल हा रिषभ पंतच्या तुलनेत शंभर पट्टीने भारी आहे, असे म्हणत काहींनी संजीव गोएंका यांच्यासह LSG च्या संघाला ट्रोल केल्याचे दिसते. आयपीएलमध्ये केएल राहुल हा लखनौ संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. संघमालकांसोबत झालेल्या वादानंतर तो या संघापासून वेगळा झाला अन् आता दिल्ली कॅपिटल्सकडून तो तोरा दाखवत आहे. दुसरीकडे लखनौच्या संघाने ज्या पंतसाठी सर्वात मोठी रक्कम मोजली तो अपयशी ठरताना दिसतोय.

Web Title: IPL 2025 LSG vs DC Sanjiv Goenka's Face After KL Rahul's Down The Ground Six Pics Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.