Join us

IPL 2025 : गिलसह शाहरुख खानसाठी 'तो' धोक्याची घंटा; बटलरसमोर फिका ठरलाय, पण...

इथं आकडेवारीच्या आधारे जाणून घेऊयात गुजरात विरुद्धच्या सामन्यात लखनौसाठी आवेश खान का ठरू महत्त्वाचा गोलंदाज त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:01 IST

Open in App

IPL 2025 LSG vs GT 26th Match Player to Watch Avesh Khan Lucknow Super Giants : रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सचा संघ घरच्या मैदानात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघाला भिडणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत हे दोन संघ ५ वेळा समोरासमोर आले आहेत. त्यात गुजरात टायटन्सच्या संघाने ४ वेळा बाजी मारलीये. लखनौचा संघ घरच्या मैदानात हा रेकॉर्ड सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. हा डाव साधण्यासाठी बॅटिंगमध्ये कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या मिचेल मार्श अन् पूरनसह गोलंदाजीत आवेश खानवर नजरा असतील. इथं आकडेवारीच्या आधारे जाणून घेऊयात गुजरात विरुद्धच्या सामन्यात लखनौसाठी आवेश खान का ठरू महत्त्वाचा गोलंदाज त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आवेश खानची गिलसह शाहरुख खानविरुद्ध छान गोलंदाजी

LSG च्या ताफ्यातील आवेश खान हा GT कॅप्टन शुबमन गिलसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतो. २०२२ च्या हंगामापासून आतापर्यंत आवेश खानने ५१ चेंडूत फक्त ६४ धावा खर्च करत शुबमन गिलला दोन वेळा आउट केले आहे. शुबमन गिलशिवाय गुजरातकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शाहरुख खानसाठीही आवेश खान धोक्याची घंटा असेल. कारण ७ चेंडूत या धडाकेबाज फलंदाजाची त्याने २ वेळा विकेट घेतली आहे.

MI नं शोधलेल्या 'हिऱ्या'ला GT नं दिला कोट्यवधींचा भाव; त्यानं फक्त २ मॅचमध्ये केली ३९ कोटींची 'कमाई'

बटलरसमोर तो फिका ठरलाय, पण....

लखनौ आणि गुजरात यांच्यातील लढतीत आवेश खान विरुद्ध जोस बटलर यांच्यातील सामनाही बघण्याजोगा असेल. आवेश खानसमोर जोस बटलर हा नेहमीच भारी ठरला आहे. बटलरनं २३ चेंडूत लखनौच्या ताफ्यातील या गोलंदाजासमोर ४२ धावा केल्या आहेत. आवेश खान इंग्लंच्या स्टार बॅटरसमोर फिका ठरला असला तरी यातही त्याने तीन वेळा बटलरची विकेटही घेतली आहे.  

आवेश खानची यंदाच्या हंगामातील कामगिरी

आवेश खान हा टीम इंडियाकडून खेळताना दिसले आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या गोलंदाजाने यंदाच्या हंगामात अजूनही लक्षवेधी अशी कामगिरी केलेली नाही. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकात ४५ धावा खर्च करून एक विकेट घेतली होती. पंजाब विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३ षटकात ३० धावा खर्च करून त्याला एकही विकेट मिळाली नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध ४ षटकांच्या कोट्यात ४० धावा खर्च करत त्याने १ विकेट घेतली. कोलकाता विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ४५ धावा खर्च करताना त्याने १ विकेट आपल्या खात्यात जमा केली होती. या कामगिरीत सुधारणा करत तो यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सगुजरात टायटन्सआवेश खानइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटरिषभ पंतशुभमन गिलजोस बटलर