Ravi Bishnoi Took Wicket On First Ball And Dedicated Zaheer Khan : लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत शतकी भागीदारीसह यंदाच्या हंगामातील सर्वोच्च सलामी दिली. शुबमन गिल आणि साई सुदर्श दोघांनी अर्धशतकी खेळी करत पहिल्या विकेटसाठी १२० धावंची भागीदारी रचली. पण ही जोडी फुटल्यावर गुजरातचा संघ १८० धावांतच आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आवेश खानने पहिली विकेट घेतली अन् मग रवी बिश्नोई पिक्चरमध्ये आला
शुबमन गिलच्या रुपात आवेश खानने लखनौला पहिले यश मिळवून दिले. गिल ३८ चेंडूत ६० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रवी बिन्नोई पिक्चरमध्ये आला. त्याने एकाच ओव्हरमध्ये साई सुदर्शन ५६ (३७) आणि वॉशिंग्टन सुंदर २ (३) यांच्या विकेट्स घेत दमदार सुरुवात करणाऱ्या गुजरातला अडचणीत आणले. या सामन्यात पहिली विकेट घेतल्यावर एक खास क्षण पाहायला मिळाला. एका बाजूला रवी बिश्नोई मैदानातून झहीर खानकडे बघत विकेटचं सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. दुसरीकडे झहीरनं डगआउटमधून रवीच्या सेलिब्रेशनला खास अंदाजात रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले.
Video: त्रिवार सलाम! खुद्द 'कोच' रिकी पॉन्टींगने मैदानावरचा कचरा उचलला अन् डस्टबिनमध्ये टाकला...
झहीरनं कानमंत्र दिला अन् रवी बिश्नोईच्या खात्यात जमा झाली पहिली विकेट
अर्धशतकवीर साई सुदर्शनची विकेट घेतल्यावर त्याने खास अंदाजात सेलिब्रेशन करण्यामागचं कारण होते ते स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये शिजलेला खास प्लॅन. गुजरात टायटन्सच्या डावातील १२ व्या षटकानंतर टाइम आउटमध्ये झहीर खान मैदानात आला. त्याने रवी बिश्नोईला कानमंत्र दिला. त्यानंतर १३ व्या षटकातील पहिल्याच षटकात रवी बिश्नोईनं सेट झालेल्या साई सुदर्शनला बाद केले. निकोलस पूरन याने त्याचा झेल टिपला.