IPL 2025 LSG vs MI 16th Match Player to Watch Tilak Varma Mumbai Indians : "शर्माजी का बेटा मुंबई इंडियन्स का दिल है...तो वर्माजी का बेटा अब इस टीम की धडकन बन गया है.." आयपीएलमधील मुंबई इंडियन्स हा लोकप्रिय संघ वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. नवीन खेळाडूंचा शोध असो वा तयार केलेल्या खेळाडूवर भरवसा दाखवत त्याला संघासोबत कायम ठेवण्याचा त्यांचा फंडा कमालीचा आहे. जो मुंबई इंडियन्समध्ये येतो इथंलाच होतो. सध्याच्या घडीला रोहित शर्मा, बुमराह हार्दिक पांड्या, सूर्या भाऊ या स्टार मंडळींच्या गर्दीत तिलक वर्मानं आपली वर्दी लावलीये. यंदाच्या हंगामाआधी झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावाआधी इशान किशनला रिलीज करत मुंबई इंडियन्सच्या संघानं तिलक वर्माला रिटेन खेळाडूंच्या फ्रेममध्ये सेट केले अन् तो MI संघाचा स्टार खेळाडू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील भरवशाची छबी जी मिस्टर IPLची कार्बन कॉपी
मुंबई इंडियन्ससह टीम इंडियाकडूनही खेळणाऱ्या या युवा आणि डावखुरा खेळाडू मिस्टर आयपीएलची कार्बन कॉपीच सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल स्पेशलिस्ट असे म्हटले जाते. जो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला आहे. तिलक वर्माच्या बॅटिंगमध्ये त्याची झलक दिसते. तिलक वर्माच्या भात्यातून निघणारे काही फटके हे सुरेश रैनाच्या अविश्वसनीय फटकेबाजीची आठवण करून देणारे असतात. ज्यात खासकरून स्क्वेअर लेगच्या फटकेबाजीचा समावेश होता. तिलक वर्मा हा रोहित शर्मासोबतच सुरेश रैनाला आदर्श मानतो. त्यामुळेच त्याच्या फलंदाजीत रैनाच्या फटकेबाजीचा तोरा पाहायला मिळणं स्वाभाविक आहे.
सुरेश रैना अन् तिलक वर्मा यांच्यातील कमालीचं साधर्म्य
तिलक वर्माच्या फटकेबाजीत सुरेश रैनाची झलक तर दिसतेच. पण बोल्ड अँण्ड गोल्ड जनरेशनमधील या दोन खेळाडूंमध्ये काही गोष्टींतील साधर्म्य हे आश्चर्यचकित करून सोडणारे आहे.
- रैनाप्रमाणे तिलक वर्मा हा देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. ही तशी एक सामन्य गोष्ट वाटू शकते.
- दोघांचा जन्म नोव्हेंबरचाच. दोन्ही डावखुऱ्या हाताने फलंदाजी करत असले तरी गोलंदाजी मात्र उजव्या हाताने करतात. आयपीएलमधील पदार्पणात सुरेश रैनानं दुसऱ्या सामन्यात पहिली फिफ्टी मारली होती. तिलक वर्माच्या बाबतीतही सेम हेच घडलं.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोघांनीही वयाच्या २० व्या वर्षी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात दोघांनीही दोन कॅचेस घेतल्याचा रेकॉर्ड
- रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेटही पहिल्या ओव्हरमध्ये घेतली होती. ज्यात त्याने डावखुऱ्या फलंदाजाची शिकार केली होती. तिलक वर्माने या गोष्टीचीही पुनरावृत्ती केली. दोन्ही वेळी टीम इंडियाने मॅच गमावली होती.
- दोघांचे टी-२० तील पहिले अर्धशतक हे पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या सामन्यात आले होते.
स्क्वेअर बिहाइंड इलाक्याचा राजा रिव्हर्स स्वीप अन् स्कूप शॉटही असतो बघण्याजोगा
तिलक वर्मा हा शॉर्ट फॉर्मेटमध्ये हिट ठरण्यामागे त्याच्या भात्यातील काही कमालीच्या आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या फट्यांचा समावेश आहे. डावखुऱ्या बॅटरच्या भात्यातून निघाणारा रिव्हर्स स्वीप हा बघावा अन् बघत बसावा असा असतो. कमालीच्या लवचिकतेसह तो स्कूप शॉटवर स्टंप मागे धावा घेतो त्यालाही तोड नाही. स्क्वेअर बिहाइंड हा त्याचा स्टाँग झोन आहे. तो या इलाक्यात खूप धावा करतो. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून तो मैदानात उतरला की, तो आपल्या भात्यातून ही नजाकत दाखवून देतोच.