लखनौविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात लखनौच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेकीनंतर यासंदर्भातील माहिती दिली. नेट्समध्ये गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्याला मुकणार असल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह लवकरच संघाला जॉईन होईल, अशी माहितीही हार्दिक पांड्याने त्याने दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितच्या जागी या भिडूला मिळाली MI कडून पदार्पणाची संधी
रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघानं राज अंगद बावा या युवा क्रिकेटला संधी दिली आहे. २०२२ च्या हंगामात या युवा क्रिकेटरनं पंजाबच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो पंजाबकडून दोन सामने खेळला आहे. पण आता लखनौ विरुद्धच्या सामन्यातून तो यंदाच्या हंगामातून मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :
विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेट किपर बॅटर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चाहर, विघ्नेश पुथूर.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर : तिलक वर्मा, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, सत्यनारायण राजू, कर्ण शर्मा
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन)
एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर बॅटर), आयुष बडोनी, डेविड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान.
लखनौ सुपर जाएंट्स इम्पॅक्ट प्लेयर : रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, मणिमारन सिद्धार्थ, आकाश सिंग.