IPL 2025 Mega Auction Timing change: आयपीएल २०२५ मेगा लिलाव प्रक्रियेसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात २४ आणि २५ नोव्हेंबरला खेळाडूंना 'करोडपती' करण्याचा 'मेला' भरणार आहे. या लिलावात IPL मधील १० फ्रँचायझी संघ ५७७ खेळाडूंवर बोली लावतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजल्यापासून मेगा लिलावाला सुरुवात होणार होती. खेळाडूंना करोडपती करणारी ही वेळेत आता बदल करण्यात आला आहे. त्यामागचं कारण आहे ते म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली पर्थ कसोटी. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती
ठिकाण अन् तारीख तीच, फक्त वेळेत थोडा बदल!
मेगा लिलावाची तारीख तीच आहे, फक्त वेळेत अर्ध्या तासांनी बदल करण्यात आला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होणारी मेगा लिलावा प्रक्रिया दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. ब्रॉडकास्टर्सच्या विनंतीवरून हा बदल करण्यात आल्याचे समजते.
लिलावाची वेळ बदलण्यामागचं कारण
एका बाजूला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पर्थच्या मैदानात रंगला आहे. ज्या दिवशी लिलाव होणार आहे त्यावेळीही मॅचचा तिसरा आणि चौथा दिवस असेल. मॅच आणि लिलाव प्रक्रिया यातील क्लॅश टाळण्यासाठी वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यातील दिवसाचा तिसऱ्या सत्रातील खेळ संपण्याची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार २ वाजून ३० मिनिटांची आहे. स्लो ओव्हर रेट किंवा बॅड लाइट यासारख्या गोष्टींमुळे सामना पुढे जाऊ शकतो. त्यामुळेच आयपीएल मेगा लिलावाचे टायमिंग अर्धा तासांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यासर आयपीएल लिलावाचे टेलिव्हिजन आणि डिजिटल अधिकार हे डिज्नी स्टारकडे आहेत. त्यामुळे बीसीसीआयने ही विनंती मान्यही केली आहे.
फायनल यादीत आणखी ३ नावांचा समावेश
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील फक्त ५७४ खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या नावांशिवाय जोफ्रा आर्चरचीही वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली होती. त्यात आणखी दोन नावांची भर पडलीये. भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटर सौरभ नेत्रवाळकर आणि मुंबईकर हार्दिक तमोरे यांचा या यादीत समाववेश करण्यात आला आहे. त्यामुळे लिलावात सहभागी असणाऱ्या खेळाडूंची संघ्या ही आता ५७७ वर पोहचली आहे.
Web Title: IPL 2025 Mega Auction Timing Change Due To Avoid Clash IND vs AUS Perth Test BGT 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.