IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट

इथं जाणून घेऊयात आयुष म्हात्रेसंदर्भातील काही खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:49 IST2025-04-20T14:44:47+5:302025-04-20T14:49:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs CSK 38th Match Lokmat Player to Watch Ayush Mhatre Chennai Super Kings | IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट

IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs CSK 38th Match Player to Watch Ayush Mhatre Chennai Super Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आणखी एक युवा क्रिकेटर आपल्यातील धमक दाखवण्यासाठी सज्ज झालाय. मुंबईकर आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून पदार्पणासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने १७ वर्षीय आयुष म्हात्रेचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात वानखेडेच्या मैदानात या युवा क्रिकेटरला पदार्पणाची संधी मिळणार असल्याची माहिती दिल्याचे दिसून येते. इथं जाणून घेऊयात आयुष म्हात्रेसंदर्भातील काही खास गोष्टी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"

 आयुष म्हात्रे पदार्पणासाठी सज्ज असल्याची चर्चा रंगत असताना त्याचा बालपणीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ही  म्हण आठवते. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या युट्यूब चॅनलवरील खास व्हिडिओमध्ये वयाच्या ६ व्या वर्षी आयुष म्हात्रे मला फलंदाज व्हायचंय हे सांगताना दिसते. या व्हिडिओमध्ये त्याच्या आजोबांचीही झलक दिसून येते. जे नातवासोबत रोज ८० कि.मी.चा प्रवास करायचे. 

IPL 2025 : स्पीड कमी, पण अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची हमी!

युवा क्रिकेटरच्या प्रवासात आजोबांची साथ 
 
आयुष म्हात्रे या युवा क्रिकेटरचा जन्म १६ जुलै २००७ साली विरार येथील एका सर्व सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षीच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायाला सुरुवात केली. त्याच्या या प्रवासात आजोबा (आईचे बाबा) लक्ष्मीकांत नाइक यांचा वाटा मोलाचा राहिला आहे. सकाळी वेळेत उठून शाळा आणि क्रिकेट कोचिंग याची योग्या सांगड ठेवत आजोबा नेहमी त्याच्यासोबत असायचे. आई-वडिलांनीही आपल्या मुलाच्या क्रिकेटर होण्याच्या प्रवासात कोणताही अडथळा येणार याची काळजी घेतली. वेळप्रसंगी आर्थिक आव्हानांचा सामना करत त्यांनी आयुषला क्रिकेटसाठी आवश्यक असणारे साहित्य पुरवले. 

विरार टू चेन्नई व्हाया मुंबई

आयुष म्हात्रेनं वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत क्रिकेटकडे करिअरच्या दृष्टिने पाहिले नव्हते. पण डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा त्याने मुंबईच्या अंडर २३ संघात स्थान मिळवले. मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. पुढच्या दहा महिन्यात तो मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून खेळताना दिसले. आयुष म्हात्रेने ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत दोन शतकांसह त्यात्या खात्यात ५०४ धावा जमा आहेत. मुंबईच्या संघाकडून तो ७ वनडे सामनेही खेळला असून यात त्याने ६५.४२ च्या सरासरीसह १३५.५० च्या  स्ट्राइक रेटनं ४५८ धावा काढल्या आहेत. यात २ शतकांचा समावेश आहे. विरारचा हा १७ वर्षीय क्रिकेटर मुंबईकडून खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडल्यावर चेन्नईच्या संघाने त्याला आयपीएलमध्ये संधी दिली आहे. या संघाकडून तो आता नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. हा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

Web Title: IPL 2025 MI vs CSK 38th Match Lokmat Player to Watch Ayush Mhatre Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.