Join us

MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनेही CSK च्या युवा खेळाडूची पाठ थोपटल्याचे पाहायला मिळाले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 21:36 IST

Open in App

Suryakumar Yadav Appreciating Of Ayush Mhatre : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातून आयुष म्हात्रे या मुंबईकरानं चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. १७ वर्षीय पोरानं पदार्पणाच्या सामन्यात  अगदी बिनधास्त फटकेबाजी करत आपल्यातील क्षमता दाखवून दिली. दमदार सुरुवात केल्यावर तो मोठी खेळी करायला चुकला. पण या छोटीखानी खेळी दाद देण्याजोगी होती. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनेही या युवा खेळाडूची पाठ थोपटल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पदार्पणाच्या सामन्यात २०० प्लसच्या स्ट्राइक रेटसह कुटल्या धावा

मैदानात उतरताच आयुष म्हात्रे याने इतिहास रचला. तो CSK कडून सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला. पदार्पणाचा सामना खाश करण्यासाठी त्याच्या भात्यातून अविस्मरणीय खेळीही आली. १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने त्याने २१३.३३ च्या स्ट्राइक रेटनं ३२ धावा कुटल्या. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् तो झेलबाद होऊन तंबूत परतला. 

Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...

सूर्या दादानं थोपटली पाठ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात CSK कड़ून मैदानात उतरण्याआधी आयुष म्हात्रे याने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून सूर्यकुमार यादवसोबतचा खास फोटो शेअर केला होता. आयपीएलमध्ये तो चेन्नईकडून खेळत असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्याच्या नेतृत्वाखालीही खेळला असल्यामुळेच दोघांच्या कमालीचे बॉन्डिंग आहे. पदार्पणाच्या सामन्यात दमदार खेळीनंतर ज्यावेळी आयुष म्हात्रे पॅव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी सूर्यकुमार यादवने आयुष म्हात्रेची पाठ थोपटत त्याच्या खेळीला दाद दिली. सोशल मीडियावर सूर्या दादा अन् युवा आयुष म्हात्रेमधील दिसलेले बॉन्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्ससूर्यकुमार अशोक यादवव्हायरल फोटोज्इंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट