IPL 2025 MI vs KKR 12th Match : यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात पहिला सामना खेळताना नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्यानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्फोटक अंदाजात फलंदाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनील नरेन याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्टच्या नावे आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. सुनील नरेनच्या विकेटसह त्याने हा रेकॉर्ड आणखी मजबूत केलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ट्रेंट बोल्ट हा मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत ३१ सामने खेळला आहे. पण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तो पहिल्यांदा MI कडून गोलंदाजी करताना दिसला. त्यामुळे सिग्नेचर स्टाइल विकेट त्याच्यासाठी आणखी खास होते.
आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- ३० - ट्रेंट बोल्ट (९६ सामने)
- २७ -भुवनेश्वर कुमार (१२६ सामने)
- १५ - प्रवीण कुमार (८९ सामने)
- १३ - संदीप शर्मा (७८ सामने)
- १३ - दीपक चाहर (७७ सामने)