Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, 12th Match : मुंबई इंडियन्सच्या संघानं वानखेडेच्या मैदानात यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर नवा स्टार अश्वनी कुमारसह ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघ अवघ्या ११६ धावांत आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या संघानं १२.५ षटकात ८ विकेट राखून सामना जिंकला. सूर्यकुमार यादवनं विजयी षटकार मारला. दुसऱ्या बाजूला रायन रिक्लटन ४१ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ६२ धावांवर नाबाद राहिला. रोहित मात्र घरच्या मैदानात छाप सोडू शकला नाही. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात तो मैदानात आला पण त्याला तिसऱ्या सामन्यातही छाप सोडता आली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ट्रेट बोल्डचा ट्रेंड पुन्हा दिसला. पहिल्याच षटकात मोठा मासा गळाला लागला
हार्दिक पांड्यानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर ट्रेंट बोल्टनं मुंबई इंडियन्सच्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्याचा पहिल्या षटकात विकेट घेण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पहिल्याच षटकात त्याने सुनील नरेनला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आली नाही. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या दीपक चाहरनं क्विंटन डिकॉकला तंबूचा रस्दा दाखवला. ही सलामी जोडी माघारी फिरल्यावर ठराविक अंतराने कोलाकाता नाईटरायडर्स संघाने आपल्या विकेट्स गमावल्या.
शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट
आधी ट्रेट बोल्ड आणि दीपक चाहरन मैफिल लुटली अन् मग पिक्चमध्ये आला नवा हिरो
वानखेडेच्या मैदानात आधी ट्रेंड बोल्ट आणि दीपक चाहर यांनी मैदान गाचवल्यावर पिक्चमध्ये आला अश्वीनी कुमार पिक्चरमध्ये आला. त्याने सेट होत असलेल्या अजिंक्य रहाणेच्या रुपात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. या स्पर्धेत त्याने आपली वेगळी छाप सोडली पदार्पणाच्या सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून रघुवंशीनं १६ चेंडूत केलेल्या २६ धावा आणि रमणदीपनं १२ चेंडूत केलेली २२ धावांची खेळी वगळता अन्य कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी कोलकाताचा डाव १६.२ षटकात ११६ धावांतच आटोपला. ंंअश्वनी याने घेतलेल्या सर्वाधिक ४ विकेट्स शिवाय दीपक चाहरनं २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. हार्दिक पांड्या, विग्नेश पुथूर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.