"लंच मे कुछ नहीं खाया..." अश्वनी म्हणाला, पदार्पणात 'मॅन ऑफ मॅच' मिळेल हे स्वप्नातही नव्हतं!

मुंबई इंडिन्सच्या संघानं वानखेडेच्या घरच्या मैदानात आणखी एक 'हिरा' लाँन्च केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 23:48 IST2025-03-31T23:40:31+5:302025-03-31T23:48:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs KKR I Just Had A Banana For Lunch Because I Was Very Nervous What Ashwani Kumar Said After Dream Debut With Man Of The Match | "लंच मे कुछ नहीं खाया..." अश्वनी म्हणाला, पदार्पणात 'मॅन ऑफ मॅच' मिळेल हे स्वप्नातही नव्हतं!

"लंच मे कुछ नहीं खाया..." अश्वनी म्हणाला, पदार्पणात 'मॅन ऑफ मॅच' मिळेल हे स्वप्नातही नव्हतं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs KKR Ashwani Kumar After Dream Debut With Man Of The Match : प्रतिभावंत खेळाडू निर्माण करणारा कारखाना असलेल्या मुंबई इंडिन्सच्या संघानं वानखेडेच्या घरच्या मैदानात आणखी एक 'हिरा' लाँन्च केला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून अश्वीन कुमार याने धमाकेदार पदार्पण केले. पदार्पणात पहिल्या बॉलवर पहिली आयपीएल विकेट घेणाऱ्या या नव्या हिरोनं ३ षटकात फक्त २४ धावा खर्च करत तगड्या कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील फलंदाजीला सुरुंग लावत मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या या पठ्ठ्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामुळे अश्वीनसाठी हा क्षण एकदम खास होता.
 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

काय म्हणाला अश्वनी?

आपल्या पदार्पणातील कामगिरीबद्दल तो म्हणाला की,  मोहालीतील एका छोट्याशा गावातून आल्याचे सांगताना तो म्हणाला की, मेहनतीचं फळं मिळाले. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होईन, असं स्वप्नही कधी पाहिले नव्हते. लंचमध्ये काय खाल्ल होतेस? या प्रश्नावर तो म्हणाला की,  पहिला सामना असल्यामुळे थोडा नर्व्हस होतो.  मॅच आधी लंच न करता फक्त एक केळ खाल्लीे होते. असेही त्याने सांगितले. 

 शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट

गावकरी माझा खेळ पाहत असतील, चांगली कामगिरी केली त्याचं समाधान 

सामन्यानंतर त्याने गावची ओढ आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना पुढचे ध्येय यावरही भाष्य केले.  गावतील मंडळी माझा खेळ  पाहत असतील. मला कधी संधी मिळणार त्याची घरच्या मंडळींप्रमाणेच गावकऱ्यांनाही उत्सुकता होती. संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केल्याचे समाधान आहे. कामगिरीतील सातत्य राखून मुंबई इंडियन्सच्या विजयात असाच पुढेही मोलाचा वाटा उचलेन, असेही तो म्हणाला आहे. 

पदार्पणात दमदार कामगिरीसह सेट केला खास विक्रम

मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडताना अश्वनी कुमार याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. आयपीएलमध्ये पदार्पणातील सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो १० गोलंदाज ठरला. या सामन्यात त्याने ३ षटकात २४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये पदार्पणात भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोच्च कामगिरी ठरली. 

Web Title: IPL 2025 MI vs KKR I Just Had A Banana For Lunch Because I Was Very Nervous What Ashwani Kumar Said After Dream Debut With Man Of The Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.