घरच्या मैदानात छोट्याखानी खेळीत रोहितचा मोठा पराक्रम! षटकारांच्या 'शतका'सह सेट केला खास विक्रम

जाणून घेऊयात त्याने घरच्या मैदानात सेट केलेल्या खास विक्रमासंदर्भातील माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 02:07 IST2025-04-18T02:05:08+5:302025-04-18T02:07:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs SRH 33rd Match Rohit Sharma Hits 100 Sixes At Wankhede Creates Historic Milestone In Front Of Home Crowd | घरच्या मैदानात छोट्याखानी खेळीत रोहितचा मोठा पराक्रम! षटकारांच्या 'शतका'सह सेट केला खास विक्रम

घरच्या मैदानात छोट्याखानी खेळीत रोहितचा मोठा पराक्रम! षटकारांच्या 'शतका'सह सेट केला खास विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs SRH Rohit Sharma Record Hits 100 Sixes At Wankhede :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात त्याने जबरदस्त सुरुवात केली. पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मुंबईतील वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याच्या भात्यातून ३ षटकार आल्याचे पाहायला मिळाले.  त्याची ही खेळी बहरली नसली तरी षटकारासह रोहितनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. जाणून घेऊयात त्याने घरच्या मैदानात सेट केलेल्या खास विक्रमासंदर्भातील माहिती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रोहित शर्मानं रचला इतिहास; वानखेडेच्या मैदानात षटकारांचे 'शतक'

रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियम १०० षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाने या मैदानात अशी कामगिरी करुन दाखवलेली नाही. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील ३ षटकारासह रोहितच्या खात्यात या मैदानात १०२ षटकारांची नोंद झाली आहे. या यादीत मुंबई इंडियन्सच्या संघाचा विद्यमान बॅटिंग कोच केरॉन पॉलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डच्या भात्यातून वानखेडेच्या मैदानात ८५ षटकार पाहायला मिळाले आहेत. सूर्यकुमार यादव ४८ षटकारासह तिसऱ्या, अंबाती रायडू ४३ षटकारांसह चौथ्या आणि जोस बटलर ४१ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. 

IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!

रोहितचा वानखेडेच्या मैदानातील रेकॉर्ड एकदम जबरदस्त

वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माचा रेकॉर्ड हा जबरदस्त राहिला आहे. आयपीएलमध्ये या मैदानात ८१ सामन्यात त्याच्या नावे २३०८ धावांची नोंद आहे. यात १६ अर्धशतकासह एका शतकाचा समावेश आहे. हैदराबाद विरुद्धची त्याची खेळी या मैदानातच रंगणाऱ्या आगामी सामन्यात त्याच्या भात्यातून मोठी फटकेबाजी येणार असल्याचे संकेत देणारी आहे. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात त्याने ट्रिकी वाटणाऱ्या खेळपट्टीवर संघाला चांगली सुरुवात करून दिली.

Web Title: IPL 2025 MI vs SRH 33rd Match Rohit Sharma Hits 100 Sixes At Wankhede Creates Historic Milestone In Front Of Home Crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.