मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३३ वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून अभिषक शर्मा आणि ट्रॅविस हेड या जोडीनं डावाची सुरुवात केली. दुसरीकडे मुंबई इंडियन्सकडून दीपक चाहरनं पहिली ओव्हर टाकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SRH च्या दोन्ही सलामीवीरांना चाहरनं फसवलं, पण...
दीपक चाहरने डावातील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्माची विकेट पडल्यात जमा होती. पण विल जॅक्सनं झेलची संधी चुकवली. परिणामी दीपक चारहने लावलेला जोर कमी पडला. झेल सुटल्यावर दोन धावा घेत अभिषेक शर्मानं आपले आणि टीमचं खाते उघडले. याच षटकात चौथ्या चेंडूवर दीपक चाहरनं ट्रॅविस हेडलाही जाळ्यात अडकवले होते. पण कर्ण शर्माला ट्रॅविस हेडला कॅच आउट करण्याची संधी गमावली. पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते गोलंदाजानं आणखी काय करायचं? असा प्रश्न निर्माण करणारे होते. चाहरच्या चेहऱ्यावरी निराशाही हाच प्रश्न उपस्थितीत करणारी होती.
IPL Record : जसप्रीत बुमराह विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
पॉवर प्लेममध्ये समसमान गेम
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॉवर प्लेममध्ये जो धमक दाखवतो तोच सामना जिंकतो असा पॅटर्न सेट होताना पाहायला मिळाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यात दोन्ही संघाची स्थितीत समसमान होती. कारण पहिल्या षटकात दोन विकेट्सच्या संधी गमावल्यावरही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी स्फोटक फलंदाजांना मोठी फटकेबाजी करण्यापासून रोखले. दुसरीकडे पॉवर प्लेमध्ये ४६ धावा काढत सलामी जोडी मैदानात टिकून राहिल्यामुळे SRH लाही फारसा तोटा झाला नाही.