IPL 2025 MI vs SRH Ishan Kishan Not Out But He Walks Out : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात खेळताना सनरायझर्स हैदराबाद संघाची तगडी फलंदाजी पुन्हा फ्लॉप ठरली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट याने ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवल्यावर मैदानात उतरलेल्या इशान किशनने तर आउट नसताना मैदानात सोडल्याचे पाहायला मिळाले. बॅटरचा आत्मविश्वास ढळल्यानं अंपायरही गडबडल्याचे पाहायला मिळाले. असं नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अपील न करता इशान किशनने मैदान सोडले, पंचांनीही मग बोट वर केले, पण..
दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टनं ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या इशान किशन याने ३ चेंडूत एक धाव केली होती. हैदराबादच्या डावातील तिसऱ्या षटकात दीपक चाहर गोलंदाजीला आला. त्याने टाकलेला पहिलाच चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला. दीपक चाहरशिवाय मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही फलंदाजाने अपील केली नव्हती. पण इशान किशनला वाटले की, चेंडू बॅटला लागला आहे. त्याने मैदान सोडले. मग मैदानातील पंचांनीही आउट देऊ का नको अशा संभ्रमात बोट वर केले.
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
इशान तंबूत परतला अन् स्निको-मीटरमध्ये तो Not Out असल्याचे दिसले
इशान किशनच्या विकेटचा रिप्ले पुन्हा दाखवण्यात आला त्यावेळी स्निको मीटरमध्ये बॅट आणि बॉल यात कोणताही संपर्क नव्हता हे दिसून आले. त्यामुळे आत्मविश्वास ढळल्याने इशान किशनने आपली विकेट फुकटात दिल्याचे पाहायला मिळाले. मैदान सोडताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला मजेशीर अंदाजात डिवचल्याचेही पाहायला मिळाले. हे दृश्य बघून इशान किशन हा सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीत असला तरी तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसते, अशा प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2025 MI vs SRH Ishan Kishan Walks But Ultra Edge Says Not Out Umpire Seen Confused Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.