जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा

मुंबई इंडियन्सच्या संघाने बुधवारी एका निवेदनाच्या माध्यमातून वर्ल्ड चॅम्पियन कोचला आपल्या ताफ्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:29 PM2024-10-16T16:29:30+5:302024-10-16T16:52:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Mumbai Indians appoints Paras Mhambrey as bowling coach | जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा

जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं एक मोठा डाव खेळला आहे. आयपीएलमधील लोकप्रिय संघानं वर्ल्ड कप विजेत्या  पारस म्हाम्ब्रे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवलीये. याआधीही हा चेहरा मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये दिसला होता. आता पुन्हा तो लसिथ मलिंगासोबत काम करताना पाहायला मिळणार आहे. ५३ वर्षीय पारस म्हाम्ब्रे २०२४ च्या हंगामात वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलेल्या भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.  मुंबई इंडियन्सच्या संघाने याआधी महेला जयवर्धने याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.  एका मागून एक 'चॅम्पियन्स'चा भरणा करत मुंबई इंडियन्सच्या संघाने स्टाफ सदस्यांच्या माध्यमातून संघ बांधणीला सुरुवात केल्याचे दिसते. जुने दिवस परत आणण्यासाठी ते पुन्हा आपल्या जुन्या सवंगड्यांवर भरवसा टाकताना दिसत आहे. 

MI संघानं जुना माणूस पुन्हा घेतला आपल्या  ताफ्यात

मुंबई इंडियन्सच्या संघाने बुधवारी एका निवेदनाच्या माध्यमातून वर्ल्ड चॅम्पियन कोचला आपल्या ताफ्यात घेतल्याची माहिती दिली आहे. "पारस म्हाम्ब्रे आणि लसिथ मलिंगा ही एक खतरनाक जोडी आहे", असे वर्णन  करत MI संघानं जुना माणूस पुन्हा ताफ्यात आल्याची माहिती शेअर केली आहे. २०२५ च्या हंगामापर्यंत त्यांच्याकडे गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

याआधीही ते MI च्या ताफ्यात दिसला होता हा चेहरा 

भारतीय संघाच्या जलदगती गोलंदाजीचा जगात दबदबा निर्माण करण्यात म्हाम्ब्रे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. टी-२० वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या ताफ्यातील हा चेहरा आता मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली मलिंगासोबत मुंबईच्या गोलंदाजीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल. याआधी २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात पारस म्हाम्ब्रे मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होते. मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये पहिली वहिली ट्रॉफी जिंकली. एवढेच नाही तर चॅम्पियन्स लीग टी २० (२०११ आणि २०१३) मध्येही जेतेपद मिळवले. त्यावेळी ते मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातच होते. पारस म्हाम्ब्रे यांनी १९९६-९८ या कालावधीत भारताकडून २ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. त्यांच्या खात्यात ५ आंतरराष्ट्रीय विकेट्स जमा आहेत.

जुन्या माणसांवर भरवसा,  पुन्हा ते जुने दिवस परत आणण्यासाठी MI चा नवा डाव

पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने नुकतेच श्रीलंकेचा माजी दिग्गज जयवर्धने याला पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली होती. याआधी हा चेहरा २०१७-२०२२ या कालावधीत मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षकाच्या रुपात दिसला होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेट किपर बॅटर मार्क बाउचरच्या जागी जयवर्धनला पुन्हा संघात आणल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता पारस म्हाम्ब्रे यांची भर पडली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ जुनी माणसं पुन्हा गोळा करून जुने दिवस परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते.  त्यांचा हा डाव कितपत यशस्वी ठरणार? खेळाडूंच्या रुपात संघासोबत कोण कायम राहणार ते पाहण्याजोगे असेल.

 

Web Title: IPL 2025 Mumbai Indians appoints Paras Mhambrey as bowling coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.