Join us

IPL 2025: Mumbai Indiansचा 'मॅचविनर' अश्वनी कुमार म्हणतो- "हार्दिकमुळे मिळाली प्रेरणा"

Aswani Kumar Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: पदार्पणाच्या सामन्यात अश्वनी कुमारने घेतल्या ४ विकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:48 IST

Open in App

Aswani Kumar Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: कर्णधार हार्दिक पांड्धाने आयपीएल पदार्पणाआधी काही गोष्टी समजावून सांगितल्या, 'पंजाबी निर्भीड असतात. मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर तुला वर्चस्व गाजवायचे आहे.' हे हार्दिकचे शब्द डोक्यात ठेवूनच भी यशस्वी ठरलो, अशी प्रतिक्रिया मुंबईसाठी पदार्पणात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमार याने मंगळवारी दिली.

पंजाबच्या झंजेरी गावातील २३ वर्षांच्या या युवा डावखुन्या गोलंदाजाने कोलकाताविरुद्ध २४ धावांत चार बळी घेतले, आयपीएल पदार्पणात चार गडी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला, अश्वनीने सामन्याआधी मनात धाकधूक असल्याने दुपारचे जेवण घेतले नव्हते. केवळ केळी खाऊन तो मैदानात उतरला होता. स्वतःला ऊर्जावान ठेवण्याचे श्रेय त्याने हार्दिकला दिले.

हार्दिकने दिलेला सल्ला

तो पुढे म्हणाला, 'हा आनंददायी क्षण आहे. पदार्पणात अशी कामगिरी करेन, असे ध्यानीमनी नव्हते. हार्दिकने मला प्रेरणा देत म्हटले की तू पंजाबमधून आला आहेस, पंजाबी कुणाला घाबरत नाहीत, प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये भीती निर्माण कर, आणि मजा घे!'

मागच्या दहा वर्षांत आयपीएलमधील पहिल्या चेंडूवर बळी घेणारा अश्वनी पहिला भारतीय गोलंदाजदेखील बनला, पहिल्या चेंडूवर त्याने कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला तिलक वर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने नंतर मनीष पांडे आणि रिंकू सिंग यांनाही माघारी धाडले, तथापि, त्याचा सर्वांत आवडता बळी ठरला तो आंद्रे रसेल! रसेल मोठा खेळाडू आहे. हार्दिकच्या सांगण्यानुसार भी योजनाबद्ध मारा केला, असे अश्वनीने सांगितले.

अश्वनीच्या यशामुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळी आनंदी आहेत. गावात सर्वत्र उत्साह आहे. मुंबई संघात स्टार खेळाडूंचा भरणा असून, आपल्या गावातील युवक या संघाचा भाग असल्याचा गावकऱ्यांना गर्व वाटतो. अश्वनी हा मुंबईच्या शोधमोहिमेचा भाग असून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या पंक्तीत त्याला स्थान मिळाले आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या