अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
जेव्हा क्रिकेटमध्ये 'टी-२०' प्रारूप सुरू करण्यात आले, तेव्हा असे वाटले होते की, त्यात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची राहणार नाही. परंतु, या प्रारूपाची मुळे मजबूत झाल्यामुळे कर्णधाराची भूमिकाही महत्त्वाची बनली आहे. शनिवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १८व्या हंगामात प्रत्येक फ्रँचायझीच्या कर्णधाराबद्दल जाणून घेऊया.
संजू सॅमसन (राजस्थान)- फ्रँचायझीचा नियमित खेळाडू असल्याने त्याला संघाचे वातावरण आणि खेळाडूमी सखोल माहिती आहे. तथापि, तो पहिल्या तीन सामन्यांमध्ये नेतृत्व करणार नाही. आयपीएलच्या पहिल्या आयुतीतील विजेत्या संघाचा १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ सॅमसनना संघयावा लागेल. सॅमसनला जोस बटलर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्टसारख्या महान खेळाडूंचा पाठिंबा मिळणार नाही. हे खेळाडू दुसऱ्या फ्रेंचावीशी जोडले गेले आहेत. सलामीचा फलंदाज, कर्णधारपद आणि वष्टिरक्षकपदाचा दबाव त्याला एकाच वेळी सहन करा सागेल,
हार्दिक पांड्या (मुंबई)- रोहितच्या जागी कर्णधार केल्याने चाहत्यांचा प्रचंड रोष हार्दिकला सहन करावा लागला. पांड्याला यंदा चांगला संघ मिळाला आहे. अनुभवी रोहित, बोल्ट, बुसाह, सूर्यकुमार आणि तिलक सर्वांसारखे खेळाडू संघात आहेत. ड्रेसिंग रूममधील वातावरण बंदा बदललेले असेल. शिवाय हार्दिकतार अधिक दबाव राहणार नाहीं. पण, कर्णधार म्हणून त्याना स्वतःला सिद्ध करावे लागेल.
अक्षर पटेल (दिल्ली)- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उच्च स्थान मिळवणारा अक्षर पहिल्यांदाच कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारत आहे. डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंतसारखे खेळाडू संघात नाहीत. त्यामुळे कर्णधारपद हे एक मोठे आव्हान ठरेल. अक्षरला एका प्रकारे दिल्ली संघाची पुनर्रचना करावी नागेन, या संजाला पहिले आयपीएल प्रेतेपद जिंकून देण्याचे आव्हान अक्षरसमोर आहे
श्रेयस अय्यर (पंजाब)- मागील सत्रात कोलकाताला विजेतेपद मिळवून दिले होते. अध्वरला आता अशा संघाचे नेतृत्व करावे लागेल, जो कधीही स्थिर दिसत नव्हता, संघात नेहमीच बदल होत गेले. अय्यरला सर्व खेळाडूंना विश्वासात घेऊन संघ तयार करावा लागेल. फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याची भूमिका महत्वाची असेल.
पॅट कमिन्स (हैदराबाद)- जागतिक किकेटला एक यशस्वी कर्णधार म्हणून पेंटकडे बघितले आने दबाव झेलण्याची क्षमता असली, तरी गेल्या वर्षी मिळविलेले उपविजेतेपद बंदा विजेतेपदात परावर्तित करावे लागेल. संघ दमदार असून, मोहमद शमी आणि अमदेव उनाडकटची कमिन्सला वेगवान गोलंदाजीत साथ मिळू शकते. ट्रॅव्हिस हेड अभिषेक सो हैविक क्लासेन, नितील कुमार रेही यांसारखे धडाकेबाज फलंदाजांमुळे फलंदाजी मजबूत
अजिंक्य रहाणे (कोलकाता)- कर्णधार करण्याचे कारण प्रत्यक्षात अनुभव आहे. (कसोटी आणि एकदिवसीय प्रारूपात जास्त आणि टी २० प्रारूपात कमी), कर्णधारपदाच्ण दबावाव्यतिरिक्त संघाला एकसंध ठेवणे, खेळामध्ये संवाद निर्माण र करणे है. त्याच्यासाठी एक आशान असेल. स्थता बाळा करून सहकारी खेळाडूसमोर आदर्श ठेवावा लागेल.
शुभमन गिल (गुजरात)- भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या शुभमनने गेल्या वर्चीही गुजरातचे नेतृत् केले होते. जोस बटलर, मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा, राशिद खान, साई किशोर यांसारख्या खेळाडूंचा भरणा आल्याने गिलला मदत मिळेल.
ऋषभ पंत (लखनौ)- फ्रँयाचझीने तब्बल २७ कोटी मोजून संघात घेतल्याने विजेतेपदाचा दबाव पंतख्या खांद्यावर असेल. खराब फटका खेळून बाद होत असल्याचा आरोप पंतवर वारंवार इालेला आहे. यात सुधारणा करून अधिक जबाबदमीपूर्वक नेतृत्व करावे लागेल दिल्लीया कर्णधारपदाचा अनुभव असल्याने पंतसाठी संघाचे नेतृत्व करणे नवे नाही.
ऋतुराज गायकवाड (चेन्नई)- गेल्या वर्षों कर्णधारपदी विराजमान झालेल्या ऋतुराजना संधाना नॉकआउटपर्यंत पोहोचविता आजाले नव्हते. काही नव्या खेळाडूंचा यंदा संधात समावेश झाल्याने त्यांच्यासोबत नौट ताळमेळ बसवावा लागेल. स्वतःला ए सक्षम कर्णधार म्हणून सिद्ध करण्यासोबत धोनीची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी ऋतुराजवर आहे. महेंद्रसिंग धोनीची उपस्थिती ऋतुराजना प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी अधिक उपयोगाची ठरणार आहे.
रजत पाटीदार (बंगळुरू)- पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत आहे. प्रचायझीच्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचे आव्हान पार्टीचार याच्यासमोर असेन. या फ्रेंचायझीमध्ये अनेक नवीन खेळाडू आहेत. कुणाल पांडवा, भुवनेश्वर कुमार, नियाग लिव्हिंगस्टोन, फिल साल्टसारख्या खेळाडूंच्या संघात अनुभवी विसर कोहलीचा समावेश आहे. सर्वांना एकत्र आणून संघ तयार करणे हे रजतसाठी एक मोठे आव्हान आहे.