'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)

टॉस वेळी त्याला थेट लग्नासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 00:50 IST2025-04-22T00:45:35+5:302025-04-22T00:50:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 No Shubman Gill blushes as Danny Morrison Asks Him About His Marriage He Says No Nothing Like That Video Goes Viral | 'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)

'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill Reply On Wedding Question : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघानं गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला ३९ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली. या सामन्यात शुबमन गिलनं ९० धावांची दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या खेळीशिवाय टॉस वेळी घडलेल्या प्रकारामुळे गिल चर्चेत आहे. टॉस वेळी त्याला थेट लग्नासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टॉस वेळी लग्नाचा प्रश्न; शुबमन गिलचा व्हिडिओ व्हायरल

आयपीएल टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसन हा टॉस वेळी आपल्या हटके शैलीत कर्णधारांसोबत संवाद साधताना दिसून येते. कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात त्याने  शुबमन गिलला थेट लग्नासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर शुबमन गिलचा चेहरा बघण्याजोगा होता. गिल थोडा लाजला अन् हसत हसत त्याने टॉस वेळी आलेल्या बाउन्सरचा सामना केला. सोशल मीडियावर गिलचा रिप्लायवाला व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!

मैदानात नेमकं काय घडलं?

कोलकाताच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकली. परंपरेनुसार टॉस जिंकणाऱ्या कॅप्टन्सी संवाद साधल्यावर मॉरिसनं २५ वर्षीय गिलकडे वळला. हँडसम दिसत आहेस. लग्नाचा विचार आहे का? असा मजेशीर प्रश्न विचारत मॉरिसनं गिलसोबतच्या गप्पा सुरु केल्या. यावर गिलने हसत हसत नाही तसा कोणताही विचार सध्या करत नाही, असे उत्तर दिले.

गिलच्या कॅप्टन्सीत GT चा धमाका

मॅचबद्दल बोलायचं तर गिलच्या दमदार ९० धावांच्या खेळीसह साई सुदर्शनचे अर्धशतक आणि जोस बटलरच्या भात्यातून आलेल्या ४१ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने कोलकातासमोर १९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना अजिंक्यच्या नेतृत्वाखालील संघ १५९ धावांपर्यंत मजल मारू शकला.

Web Title: IPL 2025 No Shubman Gill blushes as Danny Morrison Asks Him About His Marriage He Says No Nothing Like That Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.