IPL 2025 PBKS vs CSK 22th Match Player to Watch Nehal Wadhera Punjab Kings : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अय्यरसह स्टार खेळाडूंनी बहरलेल्या पंजाबच्या ताफ्यातील २५ वर्षीय नेहल वढेरानंही २०२५ चा हंगामात गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. फार कमी लोकांना माहिती असेल की, या डावखुऱ्या फलंदाजाने लाराचा विक्रम मोडून मैफिल लुटली होती. जाणून घेऊयात या पंजाबच्या मोहऱ्यासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरीस प्रकाश झोतात आलेला चेहरा
२०१७-१८ च्या हंगामात १९ वर्षाखालील चारदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत नेहल वढेरानं आपल्यातील धमक दाखवली. ६ अर्धशतकाच्या मदतीने त्याने या स्पर्धेत ५४० धावा केल्या होत्या. या दमदार कामगिरीमुळे त्याची १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली.
IPL 2025 : चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची स्टाइल कॉपी करणारा LSG च्या ताफ्यातील 'तिकीट कलेक्टर'
अंडर २३ स्पर्धेत लाराचा विक्रम मोडत घातली होती खास विक्रमाला गवसणी
२०२२ हे वर्ष या क्रिकेटरसाठी एकदम खास अन् अविस्मरणीय राहिला. एप्रिल २०२२ मध्ये आंतर-जिल्हा अंडर-२३ क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एका डावात ५७८ धावा करण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला. या स्पर्धेत त्याने चार दिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला होता. या सामन्यात त्याने एका डावात सर्वात जलद २००, ३००, ४०० आणि ५०० धावा करण्याचा खास रेकॉर्डही नोंदवला होता.
मुंबई इंडियन्सनं लावली पहिली बोली, पण...
आयपीएलमध्ये या खेळाडूवर मुंबई इंडियन्सनं पहिली बोली लावली होती. २०२२ च्या हंगामासाठी त्याला २० लाख या मूळ किंमतीसह मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पण त्याला या हंगामात पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. २०२३ च्या हंगामापासून तो पंजाबच्या ताफ्यातून खेळताना दिसते. मुंबई इंडियन्स विरुद्धच त्याने या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या हंगामातील १४ सामन्यात त्याने २४१ धावा केल्या होत्या. गत हंगामात त्याला ६ सामन्यात संधी मिळाली. आता यंदाच्या हंगामात दोन सामन्यात त्याने मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवल्याचे पाहायला मिळाले. लखनौ विरुद्ध त्याने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली होती. याशिवाय राजस्थान रॉयल्स विरुद्धही त्याच्या भात्यातून ४१ चेंडूत ६२ धावांची खेळी आली होती. या दोन सामन्यातील खेळीसह त्याने यंदााचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत. त्याला किती सामन्यात संधी मिळणार अन् तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.