IPL 2025 PBKS vs RR 18th Match Player to Watch Arshdeep Singh Punjab Kings : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल हंगामातील १८ वा सामना रंगणार आहे. चंदीगडच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात लोकल बॉय अर्शदीप सिंगवरही सर्वांच्या नजरा असतील. पंजाबच्या संघाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात त्याने बहुमूल्य विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले आहे. राजस्थान विरुद्धचा सामना त्याच्यासाठी खास असेल. कारण आयपीएलच्या इतिहासातीलच नव्हे तर टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी त्याने याच संघाविरुद्ध नोंदवली आहे. त्यात घरच्या मैदानात पुन्हा तो या संघाविरुद्ध दमदार कामगिरी करुन सिंग इज किंग शो दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० क्रिकेटमधील भारताचा किंग पंजाबची मोठी ताकद
अर्शदीप सिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सात्यपूर्ण कामगिरीसह आपली खास छाप सोडलीये. छोट्या फॉर्मेटमध्ये भारताचा तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. भारताकडून खेळताना त्याने ६३ सामन्यात सर्वाधिक ९९ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याची ही कामगिरी आयपीएलमधील पंजाब फ्रँचायझी संघाची मोठी ताकदच आहे.
IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'
पहिल्या दोन सामन्यातील कामगिरी
लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत ४३ धावा खर्च करताना ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले होते. यात कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या मिचेल मार्शला त्याने खातेही उघडू दिले नव्हते. त्याच्याशिवाय आयुष बडोनी आणि डेविड मिलरच्या रुपात त्याने मोठ्या विकेट्स मिळवल्या होत्या. पहिल्या सामन्यात अर्शदीपनं गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शन आणि शेरफेन रुदरफोर्ड या तगड्या फंदाजाना तंबूचा रस्ता दाखवला होता.
आयपीएलमध्ये कशी आहे अर्शदीपची कामगिरी?
किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याच्या पंजाब किंग्ज) संघाकडून २०१९ मध्ये पदार्पण केल्यापासून तो याच फ्रँचायझी संघाचा भाग राहिला आहे. २० लाख या मूळ किंमतीस आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्शदीपला मागील ३ हंगामात ४ कोटींचा प्राइज टॅग लागला होता. यंदाच्या हंगामात १८ कोटीसह पंजाबनं त्याला रिटेन केल्याचे पाहायला मिळाले होते. आतापर्यंत ६७ सामन्यात त्याच्या खात्यात ८१ धावांची नोंद आहे. २०२१ च्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ३२ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले होते. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे.