IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज

या तीन स्टार बॅटरवर भारी पडलाय हा गोलंदाज, पुन्हा समोरा समोर आल्यावर कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:26 IST2025-04-05T13:24:36+5:302025-04-05T13:26:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs RR 18th Match Lokmat Player to Watch Sandeep Sharma Rajasthan Royals | IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज

IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs RR 18th Match Player to Watch Sandeep Sharma Rajasthan Royals :  आयपीएल २०२५ स्पर्धेतील १८ व्या हंगामातील १८ व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि राजस्थान रायल्स हे दोन संघ आमने सामने असतील. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ घरचे मैदान असलेल्या चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आपल्या विजयाचा धडाका कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे पहिल्या दोन पराभवातून सावरल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. पंजाब विरुद्धच्या सामन्यात राजस्थानसाठी  संदीप शर्मा हा गोलंदाजीची मोठी आस असेल. यामागचं कारण पंजाबच्या ताफ्यातील तिघांविरुद्ध या गोलंदाजाचा रेकॉर्ड एकदम जबरदस्त राहिला आहे. जाणून घेऊयात कोण आहे तो गोलंदाज जो श्रेयस अय्यर, मॅक्सेवल अन् स्टॉयनिससाठी ठरू शकतो डोकेदुखी अन् कसा आहे त्याचा या तिघांविरुद्धचा रेकॉर्ड 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अय्यर, ग्लेन मॅक्सवेल अन् स्टॉयनिसवर भारी पडलाय संदीप शर्मा 

पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या ताफ्यातील संदीप शर्मावर सर्वांच्या नजरा असतील. यामागचं कारण त्याने श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टॉयनिस या तगड्या खेळाडूंना दमवलं आहे. १८ डावात ७ वेळा त्याने पंजाबच्या ताफ्यातील या स्टार खेळाडूंची विकेट घेतली आहे. त्यामुळे संदीप शर्मा पुन्हा या त्रिकुटावर भारी पडणार का? ते पाहण्याजोगे असेल.   

IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'

PBKS च्या ताफ्यातील ३ स्टार खेळाडूंविरुद्ध असा आहे RR च्या गोलंदाजाचा रेकॉर्ड

टी-२० मध्ये श्रेयस अय्यर आणि संदीप शर्मा ९ वेळा समोरासमोर आले आहेत. यात ३ वेळा संदीप शर्माने त्याची विकेट्स घेतलीये. अय्यरनं या गोलंदाजाच्या विरुद्ध ८४ च्या स्ट्राइक रेटनं फक्त ४७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध गोलंदाजी करताना संदीप शर्मानं १५ चेंडूत २५ धावा खर्च दोन वेळा त्याला बाद केले आहे. स्टॉयनिसलाही २२ चेंडूत २३ धावा खर्च करत संदीप शर्मानं दोन वेळा तंबूचा रस्ता दाखवलाय. 

संदीप शर्माची आयपीएलमधील कामगिरी

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात संदीप शर्मानं १३० सामन्यात १३९ विकेट्स घेतल्या आहेत. १८ धावा खर्च करून ५ विकेट्स ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. ही कामगिरी त्याने गत हंगामात केली होती. याशिवाय  २ वेळा त्याने चार विकेट्स घेतल्याचेही पाहायला मिळाले आहे. 

Web Title: IPL 2025 PBKS vs RR 18th Match Lokmat Player to Watch Sandeep Sharma Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.