Join us  

IPL 2025 : BCCI लवकरच लागू करणार नवा नियम; मुंबई इंडियन्सला होणार मोठा फायदा, जाणून घ्या

ipl 2025 retention rules : लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव पार पडू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:55 PM

Open in App

IPL 2025 Player Retention : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याच्या नियमात मोठा बदल होऊ शकतो. तसेच आयपीएलचा मेगा लिलाव येत्या नोव्हेंबरमध्ये भारताबाहेर पार पडू शकतो. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अलीकडेच बीसीसीआयसोबत झालेल्या बैठकीत आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यामुळे बीसीसीआय फ्रँचायझींसमोरील आव्हानांचा बारकाईने विचार करत असल्याचे कळते. 

वृत्तपत्र 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल फ्रँचायझींना आता पाच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. एकूणच एक फ्रँचायझी पाच खेळाडूंना रिटेन करू शकते. या नियमामुळे मुंबई इंडियन्ससारख्या संघाला मोठा फायदा होईल. कारण मुंबईची फ्रँचायझी कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या प्रमुख खेळाडूंना रिटेन करू शकते. बीसीसीआयसोबत झालेल्या बैठकीत आयपीएलमधील दहा फ्रँचायझींनी विविध बाबी मांडल्या होत्या. बहुतांश संघ मालकांनी किमान ५-६ खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा मिळावी असे मत मांडले. पण, एक फ्रँचायझी दोनपेक्षा अधिक परदेशी खेळाडूंना रिटेन करू शकते का याबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. 

कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझी देखील स्टार खेळाडूंना रिटेन करण्याच्या तयारीत आहेत. माहितीनुसार, बड्या खेळाडूंच्या लिलावाला विलंब केला जावा अशी मागणीही फ्रँचायझींकडून करण्यात आली. सहसा दर चार किंवा पाच वर्षांनी हा लिलाव आयोजित केला जावा. खेळाडूंमध्ये केलेली मोठी गुंतवणूक टिकवून ठेवण्यासाठी लिलाव पुढे ढकलण्यात यावा, असे केकेआरच्या फ्रँचायझीचा मालक शाहरुख खानने सुचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सबीसीसीआय