IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली

आगामी लिलावाआधी घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये रिटेन्शन आणि अनकॅप्ड खेळाडूंशी संबंधित नियमाशिवाय परदेशी खेळाडूंसाठी केलेल्या कठोर नियमाचाही समावेश आहे.    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 09:15 AM2024-09-29T09:15:04+5:302024-09-29T09:15:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 player retention rules Teams allowed six retentions With RTM Purse Hike And More All you need to know before IPL Auction | IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली

IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने  (IPL Governing Council) मेगा लिलावाआधी खेळाडूंना कायम ठेवण्यासंदर्भातील नियमावली (IPL Player Retention Rules) जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार, IPL मध्ये सहभागी असणाऱ्या १०  फ्रँचायझी संघांना रिटेन्शन किंवा RTM च्या माध्यमातून मेगा लिलावाआधी सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आगामी लिलावाआधी घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये रिटेन्शन आणि अनकॅप्ड खेळाडूंशी संबंधित नियमाशिवाय परदेशी खेळाडूंसाठी केलेल्या कठोर नियमाचाही समावेश आहे.    

आयपीएलच्या नव्या नियमावलीनुसार, लिलावाआधी मुंबई इंडियन्सला  रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादवसह अन्य मर्जीतील खेळाडूवर सहज डाव खेळता येईल. दुसरीकडे अनकॅप्डच्या नियमानुसार MS धोनीच्या रुपात चेन्नईचा संघ फायदा उठवताना दिसू शकतो.  त्यामुळे नव्या नियमावली ही MI आणि CSK च्या मनासारखी आहे, असे म्हणता येईल.   

लिलावाआधी IPL फ्रँचायझी संघांना ६ खेळाडूंवर खेळता येणार डाव

  • नव्या नियमानुसार, आयपीएल फ्रँचायझी संघांना मेगा लिलावाआधी ६ खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार आहे. याआधी ४ खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा होती. फ्रेंचायझी संघ ६ खेळाडूंवर डाव खेळताना राईट टू मॅच (RTM) पर्यायाचा वापर करू शकते. 

भारतीय खेळाडूंसाठी कॅप्ड-अनकॅप्डचा नवा नियम

  • रिटेन/RTM च्या माध्यमातून सहा खेळाडू कायम ठेवताना फ्रँचायझी संघ जास्तीत जास्त ५ कॅप्ड (भारतीय आणि परदेशी) खेळाडूंना पसंती देऊ शकतो. अनकॅप्ड खेळाडूंची मर्यादा २ अशी आहे. याचा अर्थ या गटातून दोन पेक्षा अधिक खेळाडू कायम ठेवता येणार नाहीत. राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंचा कॅप्ड खेळाडूच्या यादीत समावेश केला जातो. जे इथपर्यंत पोहचलेला नाहीत ते सर्व खेळाडू अनकॅप्ड गटात मोडतात. 

 

  • मागील पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग नसलेल्या क्रिकेटरचा अनकॅप्ड खेळा़डंच्या यादीत समावेश होईल. या नियमानुसार धोनीसारख्या खेळाडूला अनकॅप्ड गटातून संघात कायम करण्याचा निर्णय फ्रँचायझी संघांना घेता येईल. हा नियम परदेशी खेळाडूंसाठी लागू नाही.

 

बोली लागल्यावर माघार घेणं परदेशी खेळाडूंना पडणार महागात 

  • आयपीएलच्या आगामी हंगामासाठी परदेशी खेळाडूंसाठी काही कठोर नियमांचाही समावेश करण्यात आला आहे. मेगा लिलावाआधी परदेशी खेळाडूला नाव नोंदणी करणं बंधनकारक असेल. जर नाव नोंदणी न करणारा खेळाडू लिलावासाठी अपात्र ठरेल.

 

  • लिलावात बोली लागल्यानंतर एखाद्या परदेशी खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली तर त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. कारण अशा खेळाडूला पुढच्या दोन हंगामासाठी पुन्हा स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

 

  • आता प्रत्येक फ्रँचायझीसाठी लिलावात खेळाडूंवर बोली लावण्यासाठी पर्समधील पैसाही वाढला आहे. २०२५ च्या हंगामाआधी होणाऱ्या  मेगा लिलावात संघ बांधणी करताना फ्रँचायझीच्या पर्समध्ये १४६ कोटी रुपये असतील. हा आकडा आगामी हंगामी हंगामात १५१ कोटी (२०२६) आणि १५७  कोटी (२०२७), वाढवण्यात येईल, असेही  BCCI ने स्पष्ट केले आहे.  

 

  • आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेतील खेळाडूंना मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्लेइंग इलेव्हनमधील ११ खेळाडूंशिवाय इन्पॅक्ट प्लेयरच्या रुपात असलेल्या खेळाडूला प्रत्येक मॅचसाठी ७.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम करारातील रक्कमेपेक्षा स्वतंत्र असेल. 

 

  • आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर नियमासंदर्भात काय निर्णय घेतला जाणार? याचीही जोरदार चर्चा होती. २०२५ ते २०२७ पर्यंत  हा नियम कायम राहणार असल्याचे

 

Web Title: IPL 2025 player retention rules Teams allowed six retentions With RTM Purse Hike And More All you need to know before IPL Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.