चेन्नईविरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. ३० चेंडूत ३१ धावा करून तो तंबूत परतला. पण बाद होण्याआधी त आरसीबीचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने आयपीएल २०२५ च्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीनं धवनचा विक्रम मोडीत काढत
याआधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम शिखर धवनच्या नावे होता. त्याने सीएसके विरुद्ध जवळपास ४४ च्या सरासरीसह १३१ च्या स्ट्राइक रेटनं ३४ सामन्यात १०५४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. यात त्याने एका शतकासह ८ अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीनं त्याचा हा विक्रम मोडीत काढलाय.
IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी!
९ अर्धशतकासह १०८४ धावा
विराट कोहलीच्या खात्यात आता ३४ सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध १०८४ धावा जमा झाल्या आहेत. ९ अर्धशतकासह त्याने या फ्रँचायझी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. नाबाद ९० धावा ही किंग कोहलीची CSK विरुद्धची सर्वोच्च खेळी आहे.
रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणारा रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिटमॅन रोहितनं ३५ सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ८९६ धावा केल्या आहेत. या हंगामात तो एखाद्या मोठ्या खेळीसह हजारीचा पल्ला गाठू शकतो. पण विराट कोहलीच्या पुढे जाणं अवघडच आहे. रोहित पाठोपाठ या यादीत दिनेश कार्तिक ३३ सामन्यातील ७२७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली- १०८४ धावा
- शिखर धवन- १०५७ धावा
- रोहित शर्मा- ८९६ धावा
- दिनेश कार्तिक- ७२४ धावा
- डेविड वॉर्नर- ६९६ धावा