IPL 2025 RCB vs DC 24th Match Player to Watch Ashutosh Sharma Delhi Capitals आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकून देत प्रकाश झोतात आलेला चेहरा म्हणजे आशुतोष शर्मा. लखनौ विरुद्धच्या सामन्यात २१० धावांचा पाठलाग करताना अर्धा संघ तंबूत परतल्यावर ३१ चेंडूत ६६ धावांची खेळी करत त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला विजय मिळवून दिला. पण तुम्हाला माहितीये का? गोलंदाजांवर तुटून पडत धमाकेदार खेळी करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू संघात संधी मिळत नसल्यामुळे डिप्रेशनमध्येही गेला होता. जाणून घेऊयात त्याच्यासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशुतोष शर्मानं मोडलाय युवराज सिंगचा सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड
IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी हिरो ठरलेल्या आशुतोष शर्मानं याआधीही क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळीनं लक्षवेधून घेतलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठीत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ११ चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढण्याचा पराक्रम करून दाखवला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून पदार्पण करणाऱ्या आशुतोष शर्माला धडाकेबाज कामगिरी करूनही त्याचे संघातील स्थान अनिश्चित होते. संघात स्थान मिळत नसल्यामुळे डिप्रेशनमध्येही गेलो होता, ही गोष्ट त्याने एका मुलाखतीमध्ये स्वत: सांगितली होती.
IPL चा नवा हिरो...! घर सोडलं, लोकांचे कपडे धुतले, 11 चेंडूत अर्धशतक ठोकले...! कोण आहे अशुतोष शर्मा? जाणून घ्या
डिप्रेशनमध्ये असताना रेल्वेकडून ऑफर, याच संघाकडून ठोकली विक्रमी फिफ्टी
मध्य प्रदेश संघाकडून खेळताना ट्रायल मॅचमध्ये ४५ चेंडूत ९० धावांची खेळी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत ६ सामन्यात ३ अर्धशतके झळकावली पण कोच अन् निवडकर्ते त्याच्यावर विश्वास दाखवायला तयार नव्हते. नेमकं काय चुकतंय? या विचारानं क्रिकेटर डिप्रेशनमध्ये गेला. याच वेळी त्याला रेल्वेकडून नोकरीची ऑफर आली. सरकारी नोकरीसह त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा संघ मिळाला अन् रेल्वेकडून खेळताना या पठ्ठ्यानं ११ चेंडूत अर्धशतक झळकावून आपल्यातील धमक दाखवली.
विक्रमी अर्धशतकी खेळीमुळे मिळालं IPL चे तिकीट
२०२३ मध्ये सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अरुणाचल प्रदेश संघाविरुद्ध केलेल्या विक्रमी अर्धशतकामुळे तो प्रकाश झोतात आला. माजी क्रिकेटर संजय बांगरमुळे त्याची पंजाबच्या संघात एन्ट्री झाली. २० कोटीसह प्रीती झिंटाच्या सह मालकीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. गत हंगामात पंजाबच्या संघाकडून त्याला ११ सामन्यात संधी मिळाली. यात त्याने एका अर्धशतकासह १८९ धावा केल्या. आयपीएल २०२५ स्पर्धेआधी झालेल्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं त्याच्यासाठी ३.८० कोटी रुपये मोजले. या संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने स्फोटक खेळीसह आपल्या भात्यातील धमाकेदार खेळी दाखवून देत
Web Title: IPL 2025 RCB vs DC 24th Match Lokmat Player to Watch Ashutosh Sharma Delhi Capitals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.