IPL 2025 RCB vs DC KL Rahul Celebration इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं बंगळुरुचं मैदान मारलं. घरच्या मैदानात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिल्लीच्या संघानं ६ विकेट्स राखून पराभूत केले. दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील हा सलग चौथा विजय ठरला. संघाला विजय मिळवून देण्यात लोकेश राहुलनं मोलाची कामगिरी बजावली. त्याने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. विजयी षटकार मारत त्याने सामना संपवला. संघाला विजय मिळवून दिल्यावर लोकेश राहुलनं खास अंदाजात सेलिब्रेशन केले. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KL राहुलचा 'मैं हूं ना शो'! किंग कोहलीसमोर मैदान मारल्यावर खास अंदाजात सेलिब्रेशन
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ अडचणीत सापडला होता. १६३ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ५८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. लोकेश राहुलनं ट्रिस्टन स्टब्सच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी १११ धावांची दमदार भागीदारी करत सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं फिरवला. विजय षटकार मारल्यावर त्याने हे माझं घर आहे, माझे मैदान आहे असा इशारा करत विजयाचा आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुल हा आरसीबीकडून खेळलाय. एवढेच नाही तर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळतो. एम चिन्नास्वामी स्टेडियमशी केएल राहुलचं खास नाते आहे. तेच त्याने या सेलिब्रेशनमधून सांगण्याचा प्रयत्न केला.
RCB vs DC : केएल राहुलचा क्लास! DLS टार्गेट डोक्यात ठेवून हेजलवूडची धुलाई; मग सिक्सर मारत जिंकली मॅच
दिल्ली संकटात फसल्यावर KL राहुलसमोर तोऱ्यात मिरवताना दिसला कोहली
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ अडचणीत सापडला होता. RCB संघ दिल्ली कॅपिटल्सला रोखून घरच्या मैदानात मारण्याची संधी होती. दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या विकेट्स पडल्या त्यावेळी किंग कोहली आपल्या नेहमीच्या तोऱ्यात अगदी आक्रमक अंदाजात विकेटच सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. केएल राहुलसमोरही त्याने तोरा दाखवला. पण शेवटी लोकेश राहुल RCB च्या विजयाआड आला. त्याने एकहाती मॅच फिरवत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला.