Join us

RCB vs GT: किंग कोहलीचा IPL मधील सतरावा ओपनिंग पार्टनर प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा 'खतरा'च

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १० फ्रँचायझी संघातील  सर्वोत्तम सलामीवीर जोडी कोणती असेल तर ती विराट कोहली आणि सॉल्ट. कारण...

By सुशांत जाधव | Updated: April 2, 2025 11:42 IST

Open in App

IPL 2025 RCB vs PBKS 14th Match Player to Watch Philip Salt Royal Challengers Bengaluru : आरसीबीची मॅच असली की, विराट कोहली केंद्रबिंदू असणार हे वेगळ सांगयची गरज नाही. यंदाच्या हंगामात त्याच्यासोबत नवा पार्टनरही मैफिल लुटताना दिसेल. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली  एकाच फ्रँचायझीकडून खेळताना दिसतोय. गेल्या काही हंगामात कोहली फाफ ड्युप्लेसिसोबत डावाची सुरुवात करताना दिसला होता. ही जोडी सुपरहिटही ठरली. या दोघांच्या नावे ३७ सामन्यात ५१ च्या सरासरीसह १८९० धावांच्या  भागीदारीचा खास रेकॉर्ड आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोहलीचा नवा  ओपनिंग पार्टनर

फाफ डु प्लेसिसला रिलीज केल्यावर कोहलीसोबत डावाची सुरुवात कोण करणार? हा मोठा प्रश्न होता. तो रिकामा स्लॉट भरून काढण्यासाठी इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्ट याची संघात एन्ट्री झाली आहे. सॉल्ट हा कोहलीचा आयपीएलमधील १७ ओपनिंग पार्टनर ठरला. जो यंदाच्या हंगामात प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांसाठी मोठा 'खतरा' ठरू शकतो. पहिल्या दोन सामन्यातच त्याची झलक पाहायला मिळालीये. 

IPL 2025 Sai Sudharsan : पगारवाढ झाली अन् मोठी जबाबदारी आली!

सलामीच्या सामन्यातच मिळाले यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १० फ्रँचायझी संघातील  सर्वोत्तम सलामीवीर जोडी कोणती असेल तर ती विराट कोहली आणि सॉल्ट. यामागचं कारण सॉल्ट हा एक आक्रमक फलंदाज आहे. दुसरीकडे कोहली मैदानात थांबून अँकरची भूमिका बजावण्यात माहिर आहे. सलामीच्या सामन्यातच या सलामी जोडीनं ९५ धावांची धमाकेदार भागीदारी रचत यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत. दुसऱ्या सामन्यात कोहली अडखळत खेळताना दिसला. या परिस्थितीतही  दुसऱ्या बाजूला फिल सॉल्टनं  २०० च्या स्ट्राइक १६ चेंडूत ३२ धावा ठोकल्या. याच  आक्रमक अंदाजात खेळणं हाच त्याचा रोल आहे.

"टेन्शन लेने का नहीं... टेन्शन देने का" या तोऱ्यातच तो पुढेही खेळेल 

संघाला आक्रमक सुरुवात करून देत प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकणं हीच माझी भूमिका आहे, असं सॉल्टनं स्वत: सांगितले होते. त्यामुळे त्याचा रोल हा 'टेन्शन लेने का नहीं ...टेन्शन देने का' या  धाटणीतला असल्याच  एकदम स्पष्ट आहे. त्याच्या आक्रमक शैलीतील फटकेबाजीमुळे डावाची सुरुवात करातना विराट कोहलीला थोडा वेळ घेणं अगदी सहज सुलभ होऊन जाईल. किंग कोहली जेव्हा वेळ घेतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजीचा मेळ लागणं मुश्किल होऊन जाते. ही गोष्ट सॉल्टमुळे सोपी होऊ शकते.  सॉल्टनं आपला रोल परफेक्ट निभावला अन् कोहलीसोबत त्याची जोडी जमली तर भल्या भल्या गोलंदाजांसाठी ती मोठी डोकेदुखीच असेल. यंदाच्या हंगमात ही जोडी सुपरहिट ठरेल, अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर १८ व्या हंगामात १८ नंबर जर्सीतील किंग कोहलीचं अन् RCB चं ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्नही सहज साकार झाल्याचे पाहायला मिळू शकते.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीगुजरात टायटन्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट