Join us

Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली

त्याची ही खेळी आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 23:29 IST

Open in App

IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Maiden IPL Fifty For Tim David : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची अवस्था खूपच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. फिल सॉल्ट किंग कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार या स्टार खेळाडूंसह एकालाही मैदानात तग धरता आला नाही. संघ अडचणीत असताना १४ षटकांच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टीम डेविडनं लढवय्या खेळी केली. त्याने २६ चेंडूत नाबाद ५० धावा करत संघाच्या धावफलकावर ९५ धावा लावल्या. त्याच्या भात्यातून आयपीएलमधील पहिले अर्धशतक आले. त्याची ही खेळी आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळीपैकी एक ठरली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तो आला अन् कॅप्टन रजत पाटीदारनंही फेकली विकेट, मग एकट्यानं लढवला किल्ला

घरच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीच्या संघाने पहिल्या ६ षटकात ३३ धावांवर आघाडीच्या ४ विकेट्स गमावल्या होत्या. सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर क्रुणाल पांड्याची विकेट पडल्यावर त्याची जागा घेण्यासाठी टीम डेविड मैदानात आला. तो मैदानात उतरला त्यावेळी कर्णधार रजत पाटीदार १६ चेंडूत २२ धावांवर मैदानात खेळत होता. पण पुढच्या षटकात त्यानेही आपली विकेट गमावली. १८ चेंडूत २३ धावा करून तो तंबूत परतला.  दुसऱ्या बाजूनं ठराविक अंतराने विकेट पडत असताना टीम डेविडनं एकहाती किल्ला लढवत संघाच्या धावफलकावर निर्धारित १४ षटकात ९ बाद ९५ धावा लावल्या.

IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं

हेजलवूडसह अखेरच्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी

दिनेश कार्तिकनंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अर्धशतक झळकवणारा आरसीबीचा तो दुसरा फलंदाज ठरला. २०२२ च्या हंगामात कार्तिकने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी केली होती. टीम डेविडनं पंजाब विरुद्धच्या सामन्यात २६ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. जोश हेजलवूडच्या साथीनं दहाव्या विकेटसाठी त्याने नाबाद ३२ धावांची भागीदारी रचली. आयपीएलच्या इतिहासातील १० विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट