IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Player to Watch Jitesh Sharma Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सर्वोत्तम रणनितीसह मैदानात उतरल्याचे दिसते. या संघाने विकेट किपर बॅटरच्या रुपात खेळणाऱ्या जितेश शर्मावर फिनिशरची जबाबदारी सोपवल्याचे दिसते. ज्याच्या जागेवर खेळण्याची संधी मिळालीये त्या दिनेश कार्तिककडून धडे घेत तो मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याचा मंत्र जपत आहे. आतापर्यंत ट्राय न केलल्या शॉट्स खेळत तो आपल्या फलंदाजीची क्षमता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्लॅस्टिक बॉल खेळणारा गडी स्टार क्रिकेटर होण्यामागची रंजक स्टोरी
भारतीय विकेट किपर बॅटर जितेश शर्माच्या मते, फिनिशरच्या रुपात ३०-४० धावांचे योगदानही फिफ्टीपेक्षा कमी नाही. पण तुम्हाला माहितीये का? RCB च्या संघाकडून खेळताना मोठी जबाबदारी घेऊन मैदानात उतरणाऱ्या अमरावतीच्या जितेश शर्माला क्रिकेटमध्ये अजिबात रस नव्हता. प्लॅस्टिक बॉल खेळणारा हा गडी स्टार क्रिकेटर होण्यामागची स्टोरी एकदम रंजक अशी आहे. शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी तो क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते आज तुमच्या आमच्या समोर आहे.
IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी'
RCB आधी MI सह पंजाबच्या संघाकडून IPL खेळताना दिसलाय जितेश
महाराष्ट्रातील अमरावतीत २२ ऑक्टोबर १९९३ मध्ये जन्मलेल्या या क्रिकेटरला भारतीय संघाकडूनही पदार्पणाची संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. २०२३ मध्ये नेपाळ विरुद्धच्या सामन्यातून त्याला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली होती.देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व करणारा विकेट किपर बॅटर आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळण्याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे.
प्लॅस्टिक बॉलवर क्रिकेट खेळणारा जितेश स्टार क्रिकेटरच्या रुपात कसा घडला?
ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या खास मुलाखतीत जितेश शर्मानं आपल्या क्रिकेट प्रवासासंदर्भातील एक खास किस्सा शेअर केला होता. अमरावतीत क्रिकेट खेळताना एक दिवस टीम इंडियकडून खेळशील, असे वाटले होते का? या प्रश्नावर त्याने क्रिकेटमध्ये अजिबात रस नव्हता असे उत्तर दिले होते. तो म्हणाला होता की, मला क्रिकेटर वैगेरे व्हायचं नव्हते. मला या खेळात रसही नव्हता. पण दहावीपर्यंत शाळेकडून राज्यस्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्याला ४ टक्के अतिरिक्त गुण मिळायचे. हे गुण मिळवण्यासाठी मी आधी फुटबॉल खेळायचं ठरवले. आमच्या शाळेतील क्रिकेट टीम चांगली आहे, असे मित्रांनी सांगितल्यावर मी क्रिकेट ट्रायलसाठी गेलो. शाळेच्या संघात विकेट किपर नव्हता. तू विकेटकिपर आहेस का? असं विचारल्यावर मी हो म्हणालो अन् तिथून माझा विकेट किपरच्या रुपात प्रवास सुरु झाला. शाळेकडून दहावीपर्यंत मी राजस्तरावर खेळलो. खेळात प्रगती झाली अन् मी आज इथं आहे, असे तो म्हणाला होता.
जितेश शर्माची IPL मधील कामगिरी
जितेश शर्मानं आतापर्यंत ४६ आयपीएल सामन्यात ८१८ धावा केल्या असून नाबाद ४९ ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. यंदाच्या हंगामात ६ सामन्यात त्याने ८८ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ४० धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. बॅटिंगशिवाय विकेटमागे त्याने ४६ सामन्यात ३३ झेलसह ५ फलंदाजांना यष्टिचित करत तंबूत धाडले आहे.
Web Title: IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Jitesh Sharma Royal Challengers Bengaluru
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.