IPL 2025 RCB vs RR 42nd Match Player To Watch Romario Shepherd Royal Challengers Bengaluru : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघाने दमदार कामगिरी केलीये. पण घरच्या मैदानावर संघाला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तरी RCB चा संघ घरच्या मैदानात विजय मिळवणार का? याशिवाय लियाम लिविंगस्टोनच्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूचा जलवा दिसणार का? यावर सर्वांच्या नजरा असतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लियाम लिविंगस्टोनच्या जागी मिळाला RCB ला मिळाला तगडा पर्याय
आरसीबीच्या संघाने सुरुवातीच्या प्रत्येक सामन्यात लियाम लिविंगस्टोनवर विश्वास दाखवला. पण त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मग पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात संघाने या गड्याला बाहेरचा रस्ता दाखवत त्याच्या जागी रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) याला संधी दिली. उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करणाऱ्या कॅरेबियन स्टारनं त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थही ठरवला. श्रेयस अय्यरच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट घेत त्याने यंदाच्या हंगामातील पहिला सामना खास केला. या ट्रेलरमुळे उर्वरित सामन्यातील प्रत्येक सामन्यात तो पिक्चरमध्ये दिसेल, असे वाटते. इथं एक नजर टाकुयात त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर...
IPL 2025 : १४ वर्षीय पोराचा “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” तोरा अन् द्रविडची हुशारी
पावणे आठ कोटींच पॅकेज मिळाल्यावर फक्त ३ सामन्यात मिळाली संधी
रोमारियो शेफर्ड याने २०२२ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून आयपीएमध्ये पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. या हंगामात SRH च्या संघाने अष्टपैलू खेळाडूसाठी ७.७५ कोटी खर्च केले होते. पण पदार्पणाच्या हंगामात त्याला फक्त ३ सामन्यातच संधी मिळाली. या हंगामात त्याने ५८ धावा आणि ३ विकेट्स घेतल्या होत्या.
भाव घसरला! मग RCB नं कोट्यवधीचा डाव खेळला, आता...
पहिल्या हंगामानंतर त्याचा भाव घसरला. २०२३ च्या हंगामात तो ५० लाख रुपयांसह लखनौच्या ताफ्यातून खेळताना दिसले. गत हंगामात त्याच प्राइज टॅगसह तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. लखनौ संघाकडून एक तर मुंबई इंडिन्सकडून त्याला ६ सामन्यात संधी मिळाली. आतापर्यंत त्याने ११ सामन्यात ११५ धावा केल्या असून नाबाद ३९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. गत हंगामात मुंबई इंडियन्सकडून त्याने ही खेळी केली होती. याशिवाय गोलंदाजीत त्याच्या खात्यात ५ विकेट्स आहेत. यातील एक विकेटही यंदाच्या हंगामातील आहे. गत दोन हंगामात ५० लाखांत खेळणाऱ्या गड्यावर आरसीबीने १ कोटी ५० लाख रुपयांचा डाव खेळला. या संघाकडून उर्वरित हंगाम गाजवत आरसीबीसाठी हा खेळाडू कितपत उपयुक्त ठरणार ते पाहण्याजोगे असेल.