Join us

IPL 2025 : १४ वर्षीय पोराचा “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” तोरा अन् द्रविडची हुशारी

द्रविडनं अगदी हुशारीनं त्याला लॉन्च केल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:31 IST

Open in App

IPL 2025 RCB vs RR 42nd Match Player To Watch Vaibhav Suryavanshi Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सच्या संघाने यंदाच्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला मैदानात उतरवले अन् या पोरानं IPL मध्ये नवा इतिहास रचला. तो सर्वात कमी वयात आयपीएल पदार्पण करणारा क्रिकेटर ठरला आहे. त्याच्यासह द्रविडच्या नावेही खास विक्रमाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले. २०१३ च्या हंगामात द्रविडच्या नेतृत्वाखाली प्रविण तांबे याने ४१ वर्ष आणि २१२ दिवस वय असताना राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून पदार्पण केले होते. यंदाच्या हंगामात १२ वर्षांनी १४ वर्षे २३ दिवस वय असताना वैभवला IPL मध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीच सोनं करून दाखवले. द्रविडनं अगदी हुशारीनं त्याला लॉन्च केल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” 

वैभव सूर्यंवशी याने आयपीएलच्या मैदानात उतरण्याआधी १९ वर्षांखालील संघातून आपल्यातील धमक दाखवली होती. पण आयपीएलच्या रिंगणात अनुभवी आणि वर्ल्ड क्लास गोलंदाजांचा सामना तो कसा करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. शार्दुल ठाकुरसारख्या अनुभवी गोलंदाजाचा सामना करताना पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार मारत अगदी धमाक्यात पदार्पण केले. त्याचा रुबाब हा “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” असाच काहीसा होता. 

वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, ...

द्रविडची हुशारी..नेट्समध्ये जोफ्राच्या गोलंदाजीवर प्रॅक्टिस अन्....

वैभव सूर्यंवशीला मैदानात उतरवण्याआधी द्रविडनं इंग्लंडचा स्पीडस्टार जोफ्रा आर्चरचाही योग्य वापर करून घेतला. या वेगवान गोलंदाजासमोर  वैभवची टेस्ट झाली. त्यात तो पास झाल्यावर द्रविडने त्याच्या लॉन्चिंगसाठी लखनौ विरुद्धचा सामना निवडला. या संघात एकही परदेशी जलगती गोलंदाज नाही. ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या कदाचित लक्षातही आली नसेल. पण द्रविडचा हा डाव १४ वर्षांच्या पोराला मानसिकरित्या बळ देणारा होता. परदेशी गोलंदाजाचा सामना करायचा नव्हता म्हणजे चॅलेंज नव्हते असे नाही. पण नेट्समध्ये  जोफ्राच्या गोलंदाजीवर कडक बॅटिंग केल्यामुळे भारतीय जलदगती गोलंदाजाचा सामना अगदी सहज करण्याचा आत्मविश्वास त्याला  मिळाला.  

या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कसा दिसेल त्याचा तोरा 

राजस्थान रॉयल्सचा संघ आता बंगळुरुच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यंवशीच डावाची सुरुवात करताना पाहायला मिळू शकते. दमदार पदार्पणानंतर आता जोश हेजलवूड आणि रोमारिओ शेफर्ड यासारख्या परदेशी गोलंदाजांचा भेदक माऱ्यासमोर वैभव सूर्यंवशी कसा तोरा दाखवतो ते बघण्याजोगे असेल. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराहुल द्रविड