Join us  

मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 8:57 PM

Open in App

IPL 2025 Remaining Purse And Rtms Of All 10 Teams For Mega Auction : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी या लोकप्रिय स्पर्धेतील सर्व १० फ्रँचायझी संघाने गुरुवारी संघासोबत कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. १० फ्रँचायझी संघांनी एकूण ४६ खेळाडूंना रिटेन केले. त्यात फक्त दोन फ्रँचायझी संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोनच फ्रँचायझी संघानी ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची मर्यादा गाठली.

दुसरीकडे पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम करत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले. इथं एक नजर टाकुयात कोणत्या फ्रँचायझी संघानं कोणत्या खेळाडूंना संघासोबत कायम ठेवण्यासाठी किती रुपये मोजले आणि त्यांच्या पर्समध्ये मेगा लिलावासाठी किती रक्कम शिल्लक राहिली त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

मेगा लिलावासाठी कोणत्या फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये किती रुपये? 

  • पंजाब किंग्स (Punjab Kings) पर्समधील शिल्लक रक्कम ११०.५ कोटी  (या संघानं  शशांक सिंग ५.५ कोटी आणि प्रभसिमरन सिंग ४ कोटी रुपये मोजले) 

 

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) पर्समधील शिल्लक रक्कम ८३ कोटी  (या संघानं विराट कोहली २१ कोटी, रजत पाटीदार ११ कोटी आणि यश दयाल याला  ५ कोटीसह आपल्या ताफ्यात कायम ठवले )

 

  • दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पर्समधील शिल्लक रक्कम ७३ कोटी  (या संघानं अक्षर पटेल १६. ५ कोटी, कुलदीप यादव १३.२५ कोटी, स्टब्स १० कोटी आणि अभिषेक पोरेल ४ कोटी या खेळाडूंना संघात कायम ठेवले)  

 

  • गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पर्समधील शिल्लक रक्कम  ६९ कोटी (या संघानं राशीद खान १८ कोटी, शुबमन गिल १६.५ कोटी साई सुदर्शन ८.५ कोटी, राहुल तेवतिया ४ कोटी आणि शाहरुख खान ४ कोटी या खेळाडूंना गुजरातच्या संघानं आपल्या ताफ्यात कायम ठेवलं) 

 

  • लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) पर्समधील शिल्लक रक्कम ६९ कोटी  (या संघानं निकोलस पूरन २१ कोटी, रवी बिश्नोई ११ कोटी, मयंक यादव ११ कोटी, मोहसिन खान ४ कोटी आणि आयुष बडोनी ४ कोटी या खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला)

 

  • चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) पर्समधील शिल्लक रक्कम ५५ कोटी (या संघानं  ऋतुराज गायकवाड १८ कोटी, मथिशा पथिराना १३ कोटी, शिवम दुबे १२ कोटी, रवींद्र जाडेजा १८ कोटी, आणि महेंद्रसिंह धोनी ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं.)

 

  • कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) पर्समधील शिल्लक रक्कम ५१ कोटी (या संघानं रिंकू सिंह १३ कोटी, वरुण चक्रवर्ती १२ कोटी, सुनील नरेन १२ कोटी, आंद्रे रसेल १२ कोटी, हर्षित राणा ४ कोटी, रमनदीप सिंग ४ कोटी असा पैसा खर्च करत ६ खेळाडूंना ताफ्यात कायम ठेवलं)  

 

  • मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पर्समधील शिल्लक रक्कम ४५ कोटी  (या संघानं मुंबई इंडियन्सनं जसप्रीत बुमराह १८ कोटी, सूर्यकुमार यादव १६.३५ कोटी, हार्दिक पांड्या १६.३५ कोटी, रोहित शर्मा १६.३० कोटी, तिलक वर्मा ८ कोटी या खेळाडूंना रिटेन केलं)

 

  • सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)  पर्समधील शिल्लक रक्कम ४५ कोटी ( या संघानं पॅट कमिन्स १८ कोटी, अभिषेक शर्मा १४ कोटी, नितीश रेड्डी ६ कोटी, हेनरिच क्लासेन २३ कोटी आणि ट्रॅविस हेड १४ कोटी सह आपल्या ताफ्यात कायम ठेवलं)

 

  • राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) पर्समधील शिल्लक रक्कम ४१ कोटी (या संघानं संजू सॅमसन १८ कोटी, यशस्वी जैस्वाल १८ कोटी, रियान पराग १४ कोटी, ध्रुव जुरेल १४ कोटी, शेमॉन हेटमायर ११ कोटी आणि संदीप शर्मा ४ कोटी या ६ खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला) 

मेगा लिलावात कोणत्या संघाकडे RTM चा पर्याय उपलब्ध असेल?

  • चेन्नई सुपर किंग्सचा संघ RTM च्या माध्यमातून एका कॅप्ड किंवा अनकॅप्ड खेळाडूवर डाव खेळू शकतो 
  • मुंबई इंडियन्सकडेही RTM चा पर्याय उपलब्ध आहे. पण ते फक्त अनकॅप्ड खेळाडूला घेण्यासाठीच याचा वापर करू शकतात.
  • मुंबई इंडियन्स प्रमाणेच सनरायझर्स हैदराबादच्या संघाला RTM च्या माध्यमातून एका अनकॅप्ड खेळाडूवर डाव खेळता येईल.  
  • गुजरात टायटन्सच्या संघाला एका कॅप्ड खेळाडूवर डाव लावता येईल.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडे १ अनकॅप्ड आणि २ कॅप्ड खेळाडूंवर डाव खेळण्याची संधी असेल.
  • दिल्ली कॅपिटल्सचा संघ एक अनकॅप्ड आणि एक कॅप्ड खेळाडू असा डाव खेळू शकते.
  • पंजाबचा संघ ४ कॅप्ड खेळाडूंवर डाव खेळताना पाहायला मिळू शकते.
  • लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाला एका कॅप्ड खेळाडूवर डाव खेळता येईल
  • कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडे RTM पर्याय उरलेला नाही. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावपंजाब किंग्समुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सप्रीती झिंटा