Join us  

Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण

शुबमन गिलनंही आपल्या फ्रँचायझीसाठी दिलदारपणा दाखवून दिल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आलीये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 8:04 PM

Open in App

Shubman Gill Agreed to get Retained lesser Amount : गुजरात  टायटन्सच्या संघानं फार कमी वेळात आयपीएलमध्ये आपली खास छाप सोडली आहे. २०२२ मध्ये पदार्पणाच्या हंगामात या संघानं आयपीएल ट्रॉफी उचलली होती. २०२३ च्या हंगामातही हा संघ फायनल खेळताना दिसला. गत हंगामात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी ढासळली. पण तरीही फ्रँचायझी संघाने शुबमन गिलला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर टीम इंडियात प्रिन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शुबमन गिलनंही आपल्या फ्रँचायझीसाठी दिलदारपणा दाखवून दिल्याची चर्चा आहे. तुमच्यासाठी कायपण असं म्हणत कमी पगारात संघासोबत कायम राहण्यासाठी तो राजी झालाय. संघासाठी कमी पगारात मोठी जबाबदारी पार पाडायला राजी झालाय गिल 

पाच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी फ्रँचायझी संघाला पर्समधील मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. फ्रँचायझीला उत्तम संघ बांधणी करण्यासाठी हातभार लागावा, या विचारनं शुबमन गिलनं कमी पगारात संघासोबत कायम राहण्याची तयारी दर्शवली आहे, त्याचा हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चांगला संघ मिळावा अन् राशिद आपल्यात असावा या हेतूनं त्याने कमी पगारात मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची तयारी दाखवल्याचे दिसते.

कोण असेल गुजरातचा पहिल्या पसंतीचा खेळाडू?

आयपीएल रिटेंशन नियमावलीनुसार, संघासोबत कायम ठेवण्यात येणाऱ्या पहिल्या खेळाडूसाठी फ्रँचायझी संघाला १८ कोटी रुपये एवढी रक्कम मोजावी लागेल. गुजरात टायटन्सचा संघ ही रक्कम राशिद खानला देऊन त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याला पहिली पसंती देईल. त्यानंतर दुसऱ्या खेळाडूच्या रुपात शुबमन गिल रिटेन होईल, असे दिसते. दुसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी इतकी रक्कम मिळेल. तिसऱ्या खेळाडूला ११ कोटी आणि अनकॅप्ड खेळाडूंना प्रत्येक ४-४ कोटी असा खर्च फ्रँचायझीला करावा लागेल.

गुजरात टायटन्स शुबमन गिलसह या खेळाडूंना देणार पसंती 

आयपीएलशी संबंधित सूत्रांच्या हवाले वेगवेगळ्या वृत्तामध्ये करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार, गुजरात टायटन्सच्या संघानं मेगा लिलावाआधी ५ खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात कॅप्ड खेळाडूंच्या यादीत शुबमन गिल, राशिद खान आणि साई सुदर्शन यांचा सामावेश असेल. याशिवाय अनकॅप्ड खेळाडूंमध्ये या फ्रँचायझी संघाकडे मोहसीन खान, आयुष बडोनीसह  रुपात गुजरात फ्रँचायझी संघ दोन अनकॅप्ड खेळाडूंवर भरवसा दाखवणार आहे.