Join us

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हिटमॅन रोहित शर्माची एकदम दाबात एन्ट्री; व्हिडिओ होतोय व्हायरल

मालदीवमधील भटकंतीनंतर आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 22:30 IST

Open in App

Rohit Sharma Entry MI Camp : जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा ठरलेल्या आयपीएल स्पर्धेच्या १८ व्या हंगामाला २२ मार्च पासून सुरुवात होत आहे. बहुतांश खेळाडूंनी ताफ्यात एन्ट्री करत कसून सराव सुरु केला आहे. आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माही संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. लोकप्रिय फ्रँचायझी संघानं रोहित शर्माच्या संघातील एन्ट्रीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात हिटमॅन स्टायलिश अंदाजात एकदम दाबात संघाच्या ताफ्यात जॉईन झाल्याचे पाहायला मिळते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मालदीवच्या बेटांवर सुट्ट्यांचा आनंद, आता आयपीएलसाठी सज्ज झाला हिटमॅन

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील खेळाडू मुंबईतील घरचे मैदान असलेल्या वानखेडेच्या मैदानातच सराव करत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसून आले. मालदीवमधील भटकंतीनंतर आता तो संघाच्या सराव शिबीरात सामील झाला आहे.  

काळा सूट अन् काळ्या गॉगलमधील कडक लूक

बुधवारी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल अकाउंटवरून रोहित शर्माचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात संघात एन्ट्री मारण्याआधी दोन लोक त्याला टार्गेट करण्याचे प्लानिंग करताना दाखवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा लूक एकदम हॉलिवूडमधील हिरोसारखा दिसतो. काळ्या रंगाचा सूट अन् काळा गॉगलसह तो स्टायलिश अंदाजात  बॅट हातात घेऊन रुममधून बाहेर पडताना दिसते. त्याचा हा अंदाज एकदम कडक असाच आहे.

आता सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली उतरणार मैदानात

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने विक्रमी पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. मागील हंगामापासून तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून आले. यावेळी चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. पण सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने ७६ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आयपीएलमध्ये तोच शो कायम ठेवण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल. 

 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सइंडियन प्रिमियर लीग २०२५व्हायरल व्हिडिओ