Join us

IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल

माजी क्रिकेटरला रोहित शर्मा  लयीत परतत असल्याची झलक दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 20:37 IST

Open in App

Rohit Sharma Big Score Coming Soon Says Mark Boucher : भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाआधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायलनमध्ये त्याच्या भात्यातून क्लास खेळी पाहायला मिळाली. या खेळीनंतर तो आयपीएलमध्येही धमाका करेल, अशी अपेक्षा होती. पण आतापर्यंत त्याला यंदाच्या हंगामात अर्धशतक झळकावता आलेले नाही. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने कडक सुरुवात केली. पण २६ धावा करून तो तंबूत परतला. त्याच्या या खेळीनं चाहत्यांना पुन्हा निराश केले. पण याच खेळीत माजी क्रिकेटरला रोहित शर्मा  लयीत परतत असल्याची झलक दिसली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी  विकेट किपर बॅटर मार्क बाउचर याने रोहित संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळी येईल, असा विश्वास मुंबई इंडियन्सच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने व्यक्त केला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित संदर्भात नेमकं काय म्हणाला आहे बाउचर?

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर मार्क बाउचर याने मुंबई इंडियन्ससोबत मुख्य कोचच्या रुपात काम केले आहे. तो म्हणाला आहे की, सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रोहितच्या बॅटमधून मोठे षटकार पाहायला मिळाले. यावेळी त्याच्या फटकेबाजीत जुने तेवर दिसले. गोलंदाजांना दबावात टाकून त्याने धावा केल्या. रोहित शर्मा ३० धावांपर्यंत पोहचला की, त्याच्या बॅटमधून एक मोठी खेळी पाहायला मिळेल. लकवरच ही मोठी खेळी पाहायला मिळेल, असे मत मार्क बाउचर याने व्यक्त केले आहे.

IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच रोहित शर्माची IPL च्या यंदाच्या हंगामातील कामगिरी

रोहित शर्मानं यंदाच्या हंगामात ६ सामने खेळले आहेत. यात १३.६७ च्या सरासरहीसह १४३.८५ स्ट्राइक रेटसह त्याने फक्त ८२ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या २६ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पुढचा सामना वानखेडेच्या मैदानातच खेळणार आहे. या सामन्यात तो मोठी खेळी साकारणार का? ते पाहण्याजोगे असेल.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रोहित शर्मामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट