रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला

IPL 2025: 'रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंताजनक आहे. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे त्याला प्रत्येक सकाळी आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल,' असे माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने सांगितले. रोहित आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 06:47 IST2025-03-31T06:45:47+5:302025-03-31T06:47:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: Rohit will have to give it his all, Sanjay Manjrekar advises | रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला

रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

'रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंताजनक आहे. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे त्याला प्रत्येक सकाळी आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल,' असे माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने सांगितले. रोहित आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला.

मांजरेकरने एका मुलाखतीत म्हटले की, 'रोहित स्पष्टपणे एका विशिष्ट काळातून प्रवास करत आहे. तो आता ३-४ वर्षांपूर्वीचा रोहित राहिलेला नाही. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर आला आहे जिथे त्याला सर्व काही झोकून द्यावे लागेल. त्याला कठोर सराव करून आपला सर्वोत्तम स्तर मिळवावा लागेल. तो आजही आपल्या नैसर्गिक गुणवत्तेवर विश्वास ठेवून आहे.

मुंबईच्या मागील दोन सामन्यांतील विश्लेषण करताना मांजरेकरने म्हटले की, म्हणून रियान रिकेल्टनला भारतीय खेळपट्टींशी जुळवून घेण्यास वेळ जाईल. एबी डीव्हिलियर्स आणि हेन्रीच क्लासेन या दोघांचा अपवाद वगळता खूप कमी आफ्रिकी फलंदाजांनी भारतात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला वेळ द्यावा लागेल. तसेच, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंझ आणि इतर खेळाडूंसह मुंबईची फलंदाजी क्रमवारी ठरते. माझ्या मते, ही पूर्णपणे विश्वसनीय दिसत नाही. यातील अनेक फलंदाज चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येणाऱ्या खेळपट्टीवर अवलंबून असतात.'

आफ्रिकी फलंदाजांनी भारतात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला वेळ द्यावा लागेल. तसेच, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंझ आणि इतर खेळाडूंसह मुंबईची फलंदाजी क्रमवारी ठरते. माझ्या मते, ही पूर्णपणे विश्वसनीय दिसत नाही. यातील अनेक फलंदाज चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येणाऱ्या खेळपट्टीवर अवलंबून असतात.'

Web Title: IPL 2025: Rohit will have to give it his all, Sanjay Manjrekar advises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.