Join us

नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

IPL 2025, RR Vs KKR: सलामीवीर क्विंटन डी’कॉकने केलेल्या नाबात ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर  आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:31 IST

Open in App

सलामीवीर क्विंटन डी’कॉकने केलेल्या नाबात ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर  आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली. गतविजेत्या कोलकाता नाईटरायडर्सचा या हंगामातील हा पहिला विजय ठरला आहे. फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने सुरुवातीला राजस्थानला १५१ धावांवर रोखले. त्यानंतर क्विंटन डीकॉकने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर कोलकात्याने हे आव्हान सहजपणे पार केले. उल्लेखनीय बाब म्हणजे ९७ धावांच्या खेळीदरम्यान, डीकॉकने खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.

१५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर क्विंटन डीकॉकने कोलकाला नाईटरायडर्सला आक्रमक सुरुवात करून दिली. डीकॉकने ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९७ धावा कुटून काढल्या. डीकॉकने केलेली ९७ धावांची खेळी ही धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सकडून कुठल्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. या बरोबरच डीकॉकने मनीष पांडे याने २०१४ साली पंजाब किंग्सविरोधात धावांचा पाठलाग करताना केलेल्या ९४ धावांच्या खेळीचा विक्रम मोडीत काढला. 

धावांचा पाठलाग करताना केकेआरसाठी करण्यात आलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावा ९७* - क्विंटन डीकॉक, विरुद्ध राजस्थान रॉयल्स २०२५९४, - मनीष पांडे, विरुद्ध पंजाब किंग्स, २०१४९३* - ख्रिस लीन, विरुद्ध गुजरात लायन्स, २०१७९२ - मनविंदर बिसला, विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स, २०१३ ९०* - गौतम गंभीर, विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१६  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सक्विन्टन डि कॉक