Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders, 6th Match : आयपीएलच्या हंगामात तुफान फटकेबाजीसह मोठी धावसंख्या पाहायला मिळत असताना गुवाहाटीच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील गोलंदाजांचा जलवा दिसून आला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि मोईन अली या दोघांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर अक्षरश: नाचवले. वरुण अरोरा याने संजूच्या रुपात पहिली विकेट घेतल्यावर फिरकी गोलंदाज पिक्चरमध्ये आले. सुनील नरेनच्या जागी खेळणाऱ्या मोईन अलीनंही संधीचे सोने करत सर्वोत्तम गोलंदाजीसह आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वरुण चक्रवर्ती -मोईन अलीच्या फिरकीची जादू
संजू सॅमसनच्या जागी कार्यवाहून कर्णधार असलेल्या रियान परागच्या रुपात वरुण चक्रवर्तीनं आपली पहिली विकेट घेतली. १५ चेंडूत ३ षटकारासह २५ धावा करून रियान तंबूत परतला. वरुण पाठोपाठ मोईन अलीनं पार्टी जॉइन केली. त्याने नितीश राणाला अवघ्या ८ धावांवर तंबूत धाडले. पुन्हा वरुण आला अन् त्याने वानिंदु हसरंगाच्या रुपात आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. त्यानंतर सेट झालेल्या यशस्वी जैस्वालला २९ धावांवर बाद करत मोईन अलीनंही या सामन्यात दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीचं कमबॅक आणि सुनील नरेनच्या जागी खेळणाऱ्या मोईन अलीच्या कामगिरीमुळे कोलकाताच्या संघानं कॅप्टन रहाणेचा निर्णय सार्थ ठरवला. इतर गोलंदाजांनीही त्यांना उत्तम साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025 RR vs KKR: संजूचा नो 'इम्पॅक्ट' शो!; आपल्या विकेटसाठी स्वत:च विणलं यॉर्करचं जाळं (VIDEO)
राजस्थानकडून ध्रुव जुरेनं केल्या सर्वोच्च धावा
कालकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून हर्षित राणा, वैभव अरोरा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय स्पेन्सर जॉन्सन यालाही एक विकेट मिळाली. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून ध्रुव जुरेल याने केलेल्या २८ चेंडूतील ३३ धावा ही संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरलीी. अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरनं दोन षटकाराच्या मदतीने केलेल्या १६ धावांच्या जोरावर राजस्थान संघानं निर्धारित २० षटकात ९ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली.